Daisy Shah sakal
मनोरंजन

Khatron Ke Khiladi 13: रोहित शेट्टीच्या 'खतरो के खिलाडी'मध्ये दिसणार डेझी शाह...

रोहित शेट्टीचा लोकप्रिय शो खतरों के खिलाडीचा 13वा सीझन सुरू होणार आहे.

Aishwarya Musale

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी त्याच्या अॅक्शन चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे. कलाकार त्याच्या चित्रपटांमधील जबरदस्त अॅक्शन सीक्वेन्सद्वारे दीर्घकाळापासून चाहत्यांची मने जिंकत आहेत. यानंतरही त्याचे मन भरले नाही, म्हणून त्याने 'खतरों के खिलाडी' हा धोकादायक स्टंट शो आणला.

शोचे 12 सीझन सुपरहिट झाले असून आता 13व्या सीझन ऑन एअर होण्याची तयारी सुरू आहे. आता या शोमधील नवीन सहभागींची नावे समोर आली आहेत.

रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी' शोच्या 13व्या सीझनसाठी एकामागून एक स्टार्सची नावे समोर येत आहेत. यामध्ये सलमान खानच्या शो बिग बॉसचे शिव ठाकरे आणि अर्चना गौतम KKK 13 मध्ये सामील होण्याची शक्यता आहे.

आता या यादीत सलमान खानच्या चित्रपटातील एका अभिनेत्रीचे नावही जोडले गेले आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, अभिनेत्री डेझी शाह देखील या शोमध्ये दिसणार आहे.

डेझी शाह बऱ्याच काळापासून चित्रपटांमध्ये सक्रिय आहे, ती दक्षिण आणि बॉलीवूड चित्रपटांचा भाग आहे आणि सलमान खानसोबत तिची चांगली बाँडिंग देखील आहे. आता ही अभिनेत्री रोहित शेट्टीच्या शोमध्ये धोकादायक स्टंट करताना दिसणार आहे.

यावेळी शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्टार्सची नावं समोर आली असून शेवटचं नाव डेजी शाहचं असल्याचं समजतंय. तिच्याशिवाय रुही चतुर्वेदी, अंजुम फेक, अंजली आनंद, रोहित बॉय रॉय आणि अरिजित तनेजा यांच्या नावांचा समावेश आहे.

खतरों के खिलाडीचे शेवटचे दोन सीझन केपटाऊनमध्ये शूट झाले होते. मात्र शोच्या नव्या सीझनच्या शूटिंगसाठी नवीन ठिकाण निवडण्यात आले आहे. यावेळी हा शो अर्जेंटिनामध्ये शूट होणार आहे. हा शो सामान्य शोपेक्षा खूपच वेगळा असल्याने स्पर्धकांनी तयारी सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price: सोन्यातील गुंतवणुकीसाठी सरकारची नवी योजना; घरात ठेवलेल्या सोन्यावर मिळणार व्याज, काय आहे स्कीम?

Pandharpur Shegaon Railway : पंढरपूर–शेगाव रेल्वे मार्गासाठी प्रयत्नांना बळ; पुण्यात DRM यांच्याशी सविस्तर चर्चा

Marathi News Live Updates : कपडे वाळत घालण्याच्या तारेत अचानक वीजप्रवाह उतरल्याने दोन तरुण भावांचा जागीच दुर्दैवी मृत्यू

Pune News: सिंहगडावर प्रवेशाची नवी पद्धत! ॲपद्वारे पूर्वनोंदणी, गर्दी वाढल्यास प्रवेश बंद, वन विभागाचा मोठा निर्णय

ICC Test Rankings: बुमराह खेळत नसूनही अव्वल, तर ट्रॅव्हिस हेडनं गमावलं पहिल्या क्रमांकाचं सिंहासन! आता कोण झालं 'नंबर वन'?

SCROLL FOR NEXT