Khichdi 2 Teaser out news starring supriya pathak pratik gandhi kirti kulhari vandana pathak farah khan  SAKAL
मनोरंजन

Khichdi 2 Teaser: "अरे में तो थक गई!" यंदाच्या दिवाळीत फुटणार हास्याचे फटाके, खिचडी 2 चा टीझर पाहाच

सर्वांच्या आवडच्या खिचजी सिनेमाचा सिक्वेल खिचडी 2 ची घोषणा झालीय

Devendra Jadhav

Khichdi 2 Teaser News: खिचडी मालिकेने सर्वांना खळखळून हसवलं. ही मालिका आजही अनेकजण युट्यूबवर रिपीट पाहत असतात. मालिकेतल्या अनेक व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. मालिकेतले गाजलेले संवाद सुद्धा प्रेक्षकांना तोंडपाठ आहेत.

काही वर्षांपूर्वी खिचडी सिनेमा आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घालून प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं. आता खिचडी चा पुढचा भाग म्हणजेच खिचडी 2 ची घोषणा झाली असुन टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.

(Khichdi 2 Teaser out news)

खिचडी 2 चा विनोदी टीझर

खिचडी 2 चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या टीझरमध्ये पारेख परिवार एका मिशनवर चाललेले दिसत आहेत. पारेख परिवारातील हंसा, जयश्री, प्रफुल्ल, बाबूजी असे सर्व सदस्य या मिशनसाठी एकवटले आहेत.

या मिशनमध्ये त्यांच्यासोबत स्कॅम १९९२ फेम अभिनेता प्रतीक गांधी सुद्धा सहभागी असलेला दिसतोय. याशिवाय खिचडी सिनेमाच्या पहिल्या भागाप्रमाणे याही भागात फराह खान झळकणार आहे.

खिचडी सिनेमाची रिलीज डेट

खिचडी सिनेमा यंदाच्या दिवाळीत म्हणजेच १७ नोव्हेंबरला संपूर्ण भारतात प्रदर्शित होतोय. या सिनेमात सुप्रिया पाठक, किर्ती कुल्हारी, वंदना पाठक, राजीव मेहता, अनंग देसाई, जमनादास मजेठिया हे कलाकार झळकणार आहेत.

याशिवाय प्रतीक गांधी, किकू शारदा, फराह खान असे कलाकार विशेष भुमिकेत सिनेमात पाहायला मिळती. खिचडी च्या तमाम फॅन्ससाठी खिचडी 2 पाहणं ही विनोदाची पर्वणी म्हणावी लागेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pimpri Lift Accident: १२ वर्षांचा पोटचा गोळा गेला, आई पोरकी झाली... पिंपरीत मुलगा लिफ्टमध्ये कसा अडकला? काय घडलं होतं?

Robert Kiyosaki Alert: शेअर मार्केट कोसळणार; रॉबर्ट कियोसाकींचा इशारा, वॉरेन बफेंनी बदलली भूमिका

Latest Marathi News Live Update : ७१ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तारखा जाहीर

100 Years Of RSS: रेशीम बागेत चैतन्य अन्‌ उत्साह; संघ शताब्दी विजयादशमीला हजारो स्वयंसेवकांची गर्दी

IND vs WI 1st Test Live: रवींद्र जडेजाने मोडला MS Dhoni चा रेकॉर्ड! आता 'हिटमॅन'चा विक्रम संकटात; ध्रुव जुरेलसह शतकी भागीदारी

SCROLL FOR NEXT