Khtron Ke Khiladi 13 Nyrraa Banerji  Instagram
मनोरंजन

'Khatron Ke Khiladi 13' मध्ये भाग घेणं नायरा बॅनर्जीला पडलं महाग..अभिनेत्रीच्या प्रायव्हेट पार्ट्सवर किड्यांनी चक्क..

अभिनेत्री नायरा बॅनर्जीची प्रकृती एका किड्यांच्या टास्कदरम्यान बिघडल्याचं समोर आलं आहे.

प्रणाली मोरे

Khatron Ke Khiladi 13: 'पिशाचिनी' मालिकेची अभिनेत्री नायरा बॅनर्जी सध्या साउथ आफ्रिकेच्या केपटाऊनमध्ये आहे. ती तिथे रोहित शेट्टीचा रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी १३' च्या शूटिंगसाठी पोहोचली आहे.

या शो च्या शूटिंग दरम्यानचा एफ फोटो ऐश्वर्या शर्मानं शेअर केला होता जिला स्टंट दरम्यान खूप गंभीर दुखापत झाली होती. आता नायरा बॅनर्जीनं एका मुलाखतीत सांगितलं आहे की तिला एका टास्क दरम्यान एका किड्यानं खूप वाईट पद्धतीनं चावलं आहे, यामुळे तिच्या शरीरावर खोल जखम झाली आहे, एवढंच नाही तर तिच्या प्रायव्हेट पार्ट्सला देखील किड्यानं दुखापत केल्यानं शारिरीक त्रासाला सामोरं जावं लागत आहे. (Khtron Ke Khiladi 13 Nyrraa Banerji Have deep cut mark on her private parts during task)

ईटाईम्स सोबत बोलताना नायरा बॅनर्जीनं सांगितलं की आम्ही एक स्टंट केला ज्यात आमच्या अंगावर कीड्यांना सोडण्यात आलं. ते शरीराच्या प्रत्येक भागावर चढले. माझ्या प्रायव्हेट पार्ट्सला तर कीड्यांनी खूप गंभीर दुखापत केली आहे. पण मी आभार मानेन की आता हळूहळू त्या जखमा ठीक होतायत. नायराच्या म्हणण्यानुसार हा टास्क तिच्यासाठी एका वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हता.

नायरा बॅनर्जीनं संगितलं की तिनं छोट्या पडद्यापासून ब्रेक घेत या शो मध्ये एन्ट्री करण्यासाठी स्वतःला तयार केलं कारण तिला वेगळ्या गोष्टींचा अनुभव घेत वैयक्तिक विकासही करायचा होता. तिचं म्हणणं आहे की तिला आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येत काहीतरी असं करायचं होतं की ज्यामुळे भविष्यात ती काहीतरी चांगलं करु शकेल.

काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या शर्मानं आपल्याला दुखापत झाल्याचा फोटो पोस्ट केला होता. ज्यामध्ये तिचे हात पूर्णपणे निळसर झाले होते. एवढंच नाही तर अर्चना गौतमनं देखील एक व्हिडीओ पोस्ट केला होता ज्यामध्ये तिनं सांगितलं होतं की टास्क केल्यानंतर सगळे एवढं थकून जातात की समजत नाही नेमकं काय दुखतंय..स्पर्धकांना आराम करण्याचा देखील पुरेसा वेळ मिळत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI च्या कारवाईचा दणका! Dabur नंतर Zandu सह ५ कंपन्यांवर कडक कारवाई; कारण काय?

Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Marathi News Live Updates : 'आप' नेते सत्येंद्र जैन आणि इतर ४ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Sangola News : सांगोल्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT