Kiara Advani  Esakal
मनोरंजन

Kiara Advani: 'नव्या नवरीचे नऊ दिवस संपले', कियारा कामावर परतली पण ट्रोल झाली..

सकाळ डिजिटल टीम

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी हे लव्ह कपल हे आजकाल लाइमलाईटमध्ये आहे. ते कुठेही दिसले तरी त्यांना पापराझी कॅमेऱ्यात कैद करतात. 7 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकलेल्या कियारा आणि सिद्धार्थची केमिस्ट्री सर्वांनाच आवडते.

लग्नानंतरची घराबाहेरची झलक असो किंवा एअरपोर्टचे दृश्य, दोघेही प्रत्येकवेळी चर्चेत असतात. आता समोर आलेल्या नवीन व्हिडिओंमध्ये दोघेही एका अवॉर्ड शोमध्ये दिसत आहेत. या अवॉर्ड फंक्शनमध्ये दोघेही स्टेजवर एकमेकांना मिठी मारताना दिसले. मात्र यावेळी कियाराच्या हातात ना लग्नाची अंगठी, ना सिंदूर किंवा मंगळसूत्र दिसले. मग नेटकरी कुठे शांत बसणार. त्यांनी कियाराची शाळा घेतली.

यावेळी सिद्धार्थ आणि कियारा वेगळे पोहोचले होते आणि दोघांना पाहून लोक अनेक प्रश्न विचारत आहेत आणि त्या दोघांना ट्रोल करताय.

7 फेब्रुवारीला सिद्धार्थ आणि कियाराने जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये थाटामाटात लग्न केले होते. या लग्नात कुटुंबीय आणि नातेवाईकांव्यतिरिक्त बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती

तर दुसरीकडे कियारा लग्नाच्या धामधुमीनंतर कामावर परतली आहे. कियारा अडवाणीने बूमरँग व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये तयार होताना दिसते. ती कशासाठी शूटिंग करत आहे याची माहिती तिने दिली नाही. कामाबद्दल सांगायच झालं तर कियारा कार्तिक आर्यनसोबत 'सत्यप्रेम की कथा' आणि एस शंकर दिग्दर्शित राम चरणसोबत 'RC 15'साठी शूटिंग करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT