Kiara Advani Bollywood Actress esakal
मनोरंजन

'Don 3' मध्ये संधी मिळाली पण Bhool Bhulaiyaa 3 मधून कियाराचा पत्ता कट! कोणत्या अभिनेत्रीला मिळाली संधी?

कार्तिक आर्यनचा हॉरर कॉमेडी भूल भुलैय्या ३ हा चर्चेत आला आहे.

युगंधर ताजणे

Bhool Bhulaiyaa 3 : प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणीची डॉन ३ मध्ये (Don 3 Kiara Advani) निवड झाली मात्र तिच्या हातून भूल भुलैय्या ३ गेल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या सगळ्यात कोणत्या अभिनेत्रीला त्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे याविषयी चाहत्यांना उत्सुकता आहे.

कार्तिक आर्यनचा हॉरर कॉमेडी भूल भुलैय्या ३ हा चर्चेत आला आहे. गेल्या (latest entertainment news) काही दिवसांपासून त्याविषयी नेटकरी बोलू लागले आहेत. या चित्रपटामध्ये विद्या बालनची इंट्री झाली आहे. मात्र त्यातून धक्कादायक बातमी म्हणजे कियारा अडवाणीचा पत्ता त्यातून कट झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तिच्या जागी बॉलीवूडच्या दुसऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीची निवड झाल्याचे सांगण्यात येत आहे.

पहिल्यांदा मेकर्सच्या वतीनं सांगण्यात आले होते की, भुलभूलैय्याच्या तिसऱ्या भागामध्ये तब्बू ऐवजी विद्या बालनच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता मुख्य भूमिकेसाठी कियारा अडवाणीचे नाव चर्चेत होते तिच्या ऐवजी बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचे नाव प्रकाशझोतात आले आहे. त्या अभिनेत्रीचे नाव तृप्ती डिमरी असे आहे. ज्यांनी संदीप रेड्डी वांगाचा अॅनिमल पाहिला असेल त्यांना त्या अभिनेत्रीविषयी वेगळं सांगण्याची गरज नाही.

भुलभूलैय्याच्या तिसऱ्या भागात बॉलीवूडचा चर्चेतील सेलिब्रेटी दिसणार असल्याचे बोलले जात आहे. या सगळ्यात कार्तिक आर्यननं मोठी घोषणा केली असून त्यानं कियारा ऐवजी त्या चित्रपटामध्ये तृप्ती डिमरी दिसणार असल्याचे सांगितल्याची माहिती आहे.

बऱ्याच दिवसांपासून या रिप्लेसमेंटची चर्चा होती. अखेर कियाराच्या नावाला डावलून दुसऱ्या एका नावाला मेकर्सकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. कार्तिकनं त्याच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटवरुन एका वेगळ्या प्रकारे हा खुलासा केला आहे. त्यातून त्यानं कोण आहे ती अभिनेत्री असं चाहत्यांना ओळखायला लावलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT