kili paul dance on baharla ha madhumas song from film maharashtra shaheer ankush chaudhari shared video viral sakal
मनोरंजन

Viral Video: मर्दा जिंकलंस! बहरला हा मधुमास.. वर थिरकला टांझानियाचा किली पॉल.. मराठी प्रेक्षक भलतेच खुश..

टांझानियाच्या किली पॉलला 'महाराष्ट्र शाहीर'ची भुरळ..

नीलेश अडसूळ

Maharashtra shaheer movie song Baharala Ha Madhumas Nava Viral Video Reel: 'महाराष्ट्र शाहीर' सिनेमाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे. केदार शिंदे दिग्दर्शित शाहीर साबळे यांचा जीवनपट उलगडणारा हा चित्रपट आता अवघ्या काही दिवसातच आपल्या भेटीला येणार आहे.

महाराष्ट्राच्या मातीतील थोर लोकशाहीर स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांचा संपूर्ण जीवनप्रवास काही महत्वाचे प्रसंग या चित्रपटातून आपल्याला दिसणार आहेत.

या सिनेमातलं ''बहरला हा मधुमास'' (Baharla ha madhumas) हे गाणं सोशल मीडियावर खूप ट्रेंड झालं आणि अजूनही होत आहे. अनेक कलाकारही या गाण्यावर थिरकत आहेत. या गाण्यावर हजारो रील्स करण्यात आले आहेत. केवळ मराठी माणसालाच नाही तर परदेशील किली पॉल या लोकप्रिय इंस्टा स्टार बहीण भावांनाही या गाण्याची भुरळ पडली आहे.

(kili paul dance on baharla ha madhumas song from film maharashtra shaheer ankush chaudhari shared video viral)

ज्याला अवघं जग ओळखतं असा टांझानियाचा किली पॉल आणि त्याची बहीण देखील या गाण्यावर थीरकली आहे. बॉलिवूडमधील वेगवेगळ्या कलाकारांच्या गाण्यावरचे रील्स किली पॉल सोशल मीडियावर शेअर करतो. हे दोघेही बहीण भाऊ प्रचंड चर्चेत आहे . आता तर ते थेट मराठी गाण्यावर नाचल्याने सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.

अंकुश चौधरीने देखील हा व्हिडिओ शेयर केला आहे. ज्यामध्ये किली आणि त्याची बहीण नीमा पॉल हे 'बहरला हा मधुमास नवा' या मराठी गाण्यावर अत्यंत सुंदर पद्धतीने नाचले आहेत. किली आणि नीमा यांनी या डान्सचा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'या गाण्यावर डान्स केला, खूप एन्जोय केलं.. मजा आली. '

किली आणि नीमा यांच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली असून अनेकांनी त्यांच्या या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत.  एका नेटकऱ्यानं कमेंट केली आहे की, 'भाऊ मराठी प्रेक्षकांना खुश केल्याबद्दल तुला, प्रेमाचा जय महाराष्ट्र!' तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, 'मस्त डान्स केला नीमा ताई आणि किली भाऊ'. सध्या या व्हिडिओची बरीच चर्चा असून येत्या २८ एप्रिल रोजी 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kabutarkhana: ...तर आम्ही शस्त्रही उचलू; जैन समाजाच्या मुनींची थेट धमकी, कबुतरखान्यांवरील बंदीचा वाद चिघळला

Devendra Fadnavis: 'ओबीसी समाज दुरावल्याने यात्रेची आठवण'; मंडल यात्रेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Manoj Jarange: मुंबईत आंदोलन करणारच : मनोज जरांगे; 'मराठा नेत्यांना भाजपमध्ये त्रास'

MP Sanjay Raut: उद्धव ठाकरे यांनाही ‘ते’ दोघे भेटले: खासदार संजय राऊतांचा दावा; शरद पवारांच्या दाव्याचे समर्थन

Deputy Chief Minister: शिवसेना आपल्या पाठीशी: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; श्रीनगरमध्ये घोडेवाल्याच्या कुटुंबीयांनी घेतली भेट

SCROLL FOR NEXT