killer soup actor Manoj Bajpayee leaves in anger in between interview video goes viral  SAKAL
मनोरंजन

Manoj Bajpayee: "तू मुलाखत घेतोय की ऑडिशन?", म्हणत मनोज वाजपेयी रागात निघून गेले, व्हिडीओ व्हायरल

मनोज वाजपेयी चालू इंटरव्ह्यू सोडून रागाच्या भरात निघून गेल्याची घटना घडली

Devendra Jadhav

Manoj Bajpayee News: मनोज वाजपेयी हा भारतीय मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. मनोज यांनी सत्या, शूल, गँग्ज ऑफ वासेपूर, राजनीती अशा सिनेमांमधून अभिनय केलाय. मनोज यांनी OTT माध्यम सुद्धा त्यांच्या अभिनयाने गाजवलंय.

मनोज यांची 'फॅमिली मॅन' ही वेबसिरीज सध्या चांगलीच चर्चेत आहे. अशातच मनोज आगामी 'किलर सूप' वेबसिरीजमधून भेटीला येणार आहेत. पण या शोच्या प्रमोशनदरम्यान मनोज एका मुलाखतीत इतके भडकले की ते चालू मुलाखत सोडून उठून निघून गेले. काय घडलं असं?

मनोज वाजपेयी यांचा राग अनावर

मनोज वाजपेयी हे आजवर कोणत्याही वादापासून तसे दूरच राहिलेले दिसतात. अशातच सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मनोज वाजपेयींचा राग अनावर होताच ते चालू शो सोडून निघून गेले आहेत.

झालं असं की, नयनदीप रक्षीत या पत्रकाराने मनोज वाजपेयी आणि कोंकणा सेन शर्मा यांना आगामी 'किलर सूप' या सिनेमाबद्दल बोलतं केलं. त्यावेळी सिनेमामधला एक डायलॉग प्रेक्षकांसाठी सादर करण्याची विनंती केली. वाजपेयी म्हणाले, की माझा गळा खराब आहे. दुसरं काहीतरी करायला सांग.

पुढे नयनदीपने वाजपेयींना पुन्हा विनंती केली. तेव्हा मात्र त्यांचा राग अनावर झाला. ते म्हणाले, "अरे तू मुलाखत घेतोय की ऑडिशन?" असं म्हणत मनोज चालू इंटरव्ह्यू सोडून उठले. त्यांच्या या वागण्याचं पत्रकाराला आणि कोंकणा सेन शर्माला आश्चर्य वाटलं

या प्रकारासंबंधी नयनदीपने त्याची नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, This is just NOT DONE! माझ्या आयुष्यात मी कधीही कोणाला माझ्या मुलाखतीतून बाहेर पडताना पाहिले नाही. पण या एपिसोडने मला प्रचंड धक्का बसला. निःसंशयपणे, वाजपेयी सर नेहमीच एक सभ्य गृहस्थ राहिले आहेत. पण मला माहित नाही की त्या दिवशी मी त्यांना किलर सूपच्या प्रमोशनसाठी भेटलो तेव्हा काय चूक झाली.

ते नेहमी जसे असतात तसे वागत नव्हते. मला वाटलं प्रमोशनच्या दमछाक करणार्‍या दिवसामुळे आणि खराब हवामानामुळे ते थकून गेले आहेत. (त्या दिवशी त्यांच्याशी चॅट करण्यासाठी मी शेवटचा होतो) पण हे तितकेच विचित्र आहे. सहसा मी गोष्टी सोडून देतो, परंतु हे खरोखर चुकीचे आहे

मनोज वाजपेयींना खरंच राग की प्रमोशनचा भाग?

आता हा व्हिडीओ पाहून मनोज वाजपेयींना खरंच राग आलाय की हा फक्त त्यांच्या आगामी प्रमोशनचा एक भाग आहे अशी चर्चा आहे. अनेकांनी या व्हिडीओच्या खाली कमेंट करत मनोज वाजपेयी हे कधीच असं करणार नाहीत. हे सर्व नकली आहे. खोटं आहे. हा त्यांच्या आगामी किलर सूप सिनेमाच्या प्रमोशनचा भाग आहे, अशा कमेंट केल्या आहेत.

मनोज वाजपेयी आणि कोंकणा सेन शर्माची प्रमुख भूमिका असलेली 'किलर सूप' ही वेबसिरीज ११ जानेवारीला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal: मला एक दिवस कॅप्टन व्हायचंय! जैस्वालची 'मन की बात'; शुभमन गिलसमोर उभा राहिला स्पर्धक

Prashant Kishor Statement : बिहार निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेनंतर, आता प्रशांत किशोर यांनी केलं मोठं विधान, म्हणाले...

PM Modi Calls Chief Justice Gavai: सरन्याधीश गवईंना पंतप्रधान मोदींचा फोन; सर्वोच्च न्यायालयातील 'त्या' घटनेची घेतली गंभीर दखल!

तयारीला लागा! सोलापूर जिल्ह्यातील १७ पैकी ‘या’ १३ नगरपरिषदांमध्ये महिला होणार नगराध्यक्षा; नगरसेवकांच्या आरक्षणाची बुधवारी सोडत

Pune News : आमदार बापू पठारे यांना धक्काबुक्कीप्रकरणी २० जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT