मनोरंजन

'ओम'चे कानातले वापरल्याने किम कार्दशियन ट्रोल; नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

जगप्रसिद्ध मॉडेल किम नेहमीच तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते.

स्वाती वेमूल

किम कार्दशियान Kim Kardashian ही जगभरातील सर्वांत प्रसिद्ध मॉडेल असून तिचा प्रत्येक फॅशन चर्चेचा विषय ठरतो. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या किमच्या फोटोंवर लाखो लाइक्स आणि कमेंट्स येत असतात. ती पुन्हा एकदा चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे किमच्या नव्या फोटोशूटमध्ये तिने वापरलेले कानातले. 'ओम'चं चिन्ह असलेले कानातले किमने घातले असून त्यावरून तिच्यावर टीका होत आहे. किमने भारतीय संस्कृतीचा अपमान केल्याचा आरोप तिच्यावर होत आहे. (kim kardashian trolled after she wears om earings)

ओम हे भारतीयांसाठी अत्यंत पवित्र आणि धार्मिक प्रतिक असून, ते अशा पद्धतीने कानात वापरणं चुकीचं असल्याचं काही नेटकऱ्यांनी म्हटलंय. 'हे सेलिब्रिटी धर्माचा वापर फॅशनमध्ये करणं कधी बंद करतील', असं एकाने म्हटलंय. तर 'तुझ्यासाठी ते फक्त फॅशनचं साधन असलं तरी हिंदूंसाठी ओम हे खूप पवित्र आहे', असं दुसऱ्याने म्हटलं.

किम याआधीही अनेकदा तिच्या फॅशनमुळे ट्रोल झाली आहे. 'ड्रामा क्वीन' म्हणूनच तिची हॉलिवूडमध्ये ओळख आहे. मॉडेलिंगसोबत किम तिच्या चित्रविचित्र पेहराव, मादक फोटोशूट, वादग्रस्त वक्तव्य यांमुळेच जास्त चर्चेत असते. असं असलं तरी इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅपवर तिचे सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर ब्रँडिंग अथवा जाहिरातीच्या एका पोस्टसाठी ती कोट्यवधी रुपये घेते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT