मनोरंजन

'अजून किती बॉयफ्रेंड करशील'? किम शर्मा ट्रोल

कोणे एकेकाळी अभिनेत्री किम शर्माची (kim sharma) बॉलीवूडमध्ये (bollywood) हवा होती. मात्र आता ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी झाली आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - कोणे एकेकाळी अभिनेत्री किम शर्माची (kim sharma) बॉलीवूडमध्ये (bollywood) हवा होती. मात्र आता ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी झाली आहे. ती तिच्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असते. सध्या ती चर्चेत आली आहे ती लिएंडर पेस सोबतच्या फोटोंमुळे. त्या फोटोंवरुन तिला चाहत्यांच्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं आहे. अनेकांनी तिला वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट करुन ट्रोल केलं आहे. दरवेळी किम शर्माचं नाव हे अनेकांशी जोडलं गेलं आहे. आपल्या अनेक नात्यांसाठी ती प्रख्यात आहे असं तिच्या ट्रोलर्सचं म्हणणं आहे. हर्षवर्धन राणे सोबत जेव्हा तिचं ब्रेक अप झालं तेव्हा तिचे नाव भारताचा टेनिस स्टार खेळाडू लिएंडर पेस सोबत जोडलं गेलं होतं. (kim sharma and leander paes romantic evening actress troll on social media yst88)

आता ते दोघही एकमेकांना डेट करत असल्याचे दिसून आले आहे. ते गोव्यात असतानाचे फोटो काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते. आता त्यांचे मुंबईत एकमेकांसोबत असल्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याला त्या दोघांच्याही चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या फोटोमुळे ते दोघेही एकमेकांना डेट करत आहेत आणि ते एकमेकांच्या प्रेमात असल्याचं त्यांच्या चाहत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यावर चर्चा सुरु झाली आहे. काही मोजक्याच चित्रपटांमध्ये दिसलेल्या किमला लिएंडरमुळे ट्रोल केले जात आहे.

जेव्हा मुंबईच्या रस्त्यावर त्यांना पाहिले गेले तेव्हापासून वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे. फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यातून त्यांची सुटका झालेली नाही. ते त्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत. दरम्यान किमच्या नावाचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आणि त्यावरुन ती ट्रोल होण्यास सुरुवात झाली. तो व्हिडिओ पाहून तिला ट्रोलर्सनं विचारलं आहे की, आता पुन्हा तुझा बॉयफ्रेंड बदलला आहे का, दुसऱ्या युझर्सनं लिहिलं आहे की, आता लिएंडर पेस कोण आहे, तो आता किम शर्माचा नवा शिकारी आहे. अशाप्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैभव सूर्यवंशी म्हणजे भारतीय क्रिकेट नाही! १५ वर्षीय खेळाडूला टीम इंडियात संधी देण्याच्या विरोधात उभा राहिला दिग्गज, म्हणाला...

Sinhgad Palace History : सिंहगडावरचा भव्यदिव्य राजवाडा कोणी विकला? थक्क करणारा इतिहास अन् दुर्मिळ फोटो पाहा

Kerala Monsoon Update : माॅन्सूनचा केरळात पोहोचण्याचा मुहूर्त हुकला, महाराष्ट्रात कधी येणार? पुढील 2-3 दिवस काही भागात पावसाची शक्यता

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Latest Marathi News Live Update : ठाण्यात शिवसेनेवर भाजपचं दबाव तंत्राची चर्चा सुरू

SCROLL FOR NEXT