Aryan Shahrukh Khan sakal
मनोरंजन

किंग खानच्या आर्यनला जामीन नाकारला कारण...

बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या मुलाला आर्यनचा जामीन सत्र न्यायालयानं फेटाळून लावला आहे.

युगंधर ताजणे

बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या मुलाला आर्यनचा जामीन सत्र न्यायालयानं फेटाळून लावला आहे. एनसीबीनं केलेल्या युक्तिवादाच्या आधारे आणि त्यांनी सादर केलेल्या पुरावे पाहता न्यायालयानं जामीन नाकारला आहे. त्याच्यासह आणखी दोघांनाही जामीन मिळालेला नाही. यासगळ्या प्रकरणात कोणत्या कारणावरुन आर्यनला जामीन नाकारण्यात आला त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. आर्यन खानला अद्याप दिलासा मिळालेला नाही. एनसीबीनं सादर केलेल्या पुराव्यांमध्ये व्हाट्स अप चॅट ग्राह्य धरण्यात आले आहे. त्यामध्ये भलेही आर्यननं डॅग्जचे सेवन केले नसले तरी त्याचा कटात सहभाग होता. असा युक्तिवाद एनसीबीनं केला आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हाट्स अप चॅट्स आणि एनसीबीचा तपास याच्या आधारावर आर्यन, अरमान यांना जामीन नाकारण्यात आला आहे. आर्यनकडे भलेही ड्रॅग्ज सापडले नसले तरी तो त्या क्रुझवर ड्रग्ज घेणार होता. असे त्या चॅट्समधून समोर आले आहे. आपण एखाद्याशी काय संभाषण करतो हे देखील विरोधात जाऊ शकते. आपल्या सोबतच्या माणसानं ड्रग्ज घेणं हा देखील त्या व्यक्तीच्या संबंधात असलेल्या व्यक्तीसाठी धोकादायक ठरते. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या पुराव्याच्या आधारे आर्यन हा ड्रग्ज घेणार होता. आरोपीला जामीन मिळत नाही. त्या संभाषणाचा तुम्ही भाग होता. याचा अर्थ तुम्ही कटात सहभागी होता. याशिवाय तो बॉलीवूडमधील मोठा सेलिब्रेटी आहे. तो समाजातील हायप्रोफाईल व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्याच्यासोबतच्या पुराव्यांशी छेडछाड केली जाऊ शकते. या गोष्टी एनसीबीच्या युक्तिवादामध्ये सांगण्यात आले होते.

भलेही आर्यनला आता जामीन मिळाला नसला तरी त्याला जामीनासाठी आर्यनला उच्च न्यायालयात जाता येणार आहे. दिवाळीच्या सुट्या आहेत. त्वरीत करावे लागणार आहे. यावर वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार उद्यापर्यत हा अर्ज करावा लागेल. उच्च न्यायालयातही युक्तिवाद केला जाईल. त्यावर निर्णय दिला जाईल. यापूर्वी रिया चक्रवर्तीच्या केसमध्ये व्हाटस अप चॅट महत्वाचे होते. त्याची व्हॅल्यु आहे. घटनेच्या वेळी असणारे पुरावे म्हणून त्याकडे पाहिले गेले आहे. त्या चॅटमधून महत्वाची माहिती समोर आल्याचं एनसीबीनं कोर्टाला सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

जय शाहांनंतर आणखी एक भारतीय ICC मध्ये! नवे CEO झालेले संजोग गुप्ता आहेत तरी कोण?

Latest Maharashtra News Updates : मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकास करताना म्हाडाला बांधकाम करून मिळणार

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

SCROLL FOR NEXT