Kingdom Of The Planet Trailer Hollywood Movie  esakal
मनोरंजन

Kingdom of the Planet Trailer : माणसांच्या जगात पुन्हा एकदा 'माकडं' आली! 'किंग्डम ऑफ प्लॅनेट'चा थरारक ट्रेलर

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ट्रेलरनं (Kingdom of the Planet Trailer) चाहत्यांना प्रतिक्रिया देण्यास (Latest News) भाग पाडले आहे.

युगंधर ताजणे

Kingdom Of The Planet Trailer : हॉलीवूडच्या चित्रपटांची गोष्ट जरा वेगळीच असते. ते त्यांच्या चित्रपटातून वेगवेगळ्या गोष्टींची कल्पनात्मक मांडणी करुन जो परिणाम साधायचा तो साधतातच. त्यामुळे प्रेक्षकांपर्यत त्यांना त्यांचा आशय पोहचवता येतो. सध्या किंग्डम (Kingdom of the Planet of the Apes trailer) ऑफ द प्लॅनेट ऑफ द एप्स नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर चर्चेत आला आहे. त्याला कारणही तसेच आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ट्रेलरनं चाहत्यांना प्रतिक्रिया देण्यास (Latest News) भाग पाडले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची जोरदार चर्चा होती. या चित्रपटाची कथा जोश फ्रिडमन, रिफ जाफा, अमांडा सिल्व्हर आणि पेट्रीक ऐसन यांची असून हा चित्रपट १० मे २०२४ रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हॉलीवूडमधील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक म्हणून किंग्डम ऑफ द प्लॅनेट कडे पाहिले जात आहे.

२० सेंच्युरी स्टुडिओज यांच्यावतीनं या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचे दिग्दर्शन वेस बॉलनं केलं आहे. त्यांनी माकड आणि मानव यांच्यातील पृथ्वीवरील संघर्ष या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवला आहे. यापूर्वी प्लॅनेट ऑफ अॅप्स नावाच्या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता.त्यानंतर आता आलेला किंग्डम ऑफ द प्लॅनेट याची चर्चा आहे.

हा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून त्याच्या ट्रेलरला प्रेक्षकांची जोरदार पसंती मिळत आहे. त्यात प्रेक्षकांना ओवेन टीग, फ्रेया एलन आणि केविन डुरंड यांच्या प्रमुख भूमिका आहेत.त्या ट्रेलरमध्ये असे दाखवण्यात आले आहे की, भविष्यात मानव आणि माकडं ही एकमेकांसोबत राहतात असे त्यात भाकित केलं गेलं आहे. ट्रेलरमध्ये माकडं त्या ग्रहावर आपलं राज्य असल्याचे सांगतात.त्यासाठी मोठा संघर्ष उभा करतात. त्यातून होणारी लढाई ही किती भयानक आहे हे त्यातून सांगण्यात येत आहे.

माकडं ही आता माणसांना गुलाम करु पाहताहेत. हे त्या चित्रपटातील मुख्य सुत्र असल्याचे सांगण्यात येते. याचवेळी माकडं आणि मानव यांच्यात वादाला सुरुवात झाली आहे. ट्रेलर मध्ये माकडांचं वेगळचं रुप दिसून येतं. त्यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: महत्वाच्या विषयांवर फडणवीसांची भेट घेतली- राज ठाकरे

Reels addiction Impact on Brain: रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT