kiran mane emotionally crying in bigg boss marathi 4 last week  sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: मला ऑस्कर जरी मिळाला तरी मी.. शेवटच्या क्षणी किरण माने भावूक..

बिग बॉस मराठीमध्ये सर्वांना नडणारा अभिनेता किरण माने अक्षरशः रडला.

नीलेश अडसूळ

bigg boss marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरातील एक वादग्रस्त चेहरा म्हणजे किरण माने. किरण माने यांचे बाहेरच्या जगातील गाजलेले वाद आपल्याला परिचित आहेच, म्हणून हा चेहरा बिग बॉसच्या घरात आला आणि ही खणखणीत वाजलं. किरणच्या अनेक गोष्टी इतर सदस्यांना पटत नसल्याने त्याला सतत नॉमिनेट करण्यात आलं. किरण माने बिग बॉसच्या घरात राहतोय की नाही अशी चिन्ह निर्माण झाली पण सातरच्या या पठ्ठ्याने शेवट पर्यंत गड राखला. आणि शेवटच्या आठवड्यात प्रवेश केला. पण एरव्ही वाघासारखा भिडणारा किरण यावेळी मात्र भलताच भावूक झालेला दिसला.

(kiran mane emotionally crying in bigg boss marathi 4 last week )

जवळपास ९३ दिवसांचा टप्पा पार करून किरण माने बिग बॉसच्या मराठीच्या शेवटच्या आठवड्यात पोहोचला. इथपर्यंतचा त्याचा प्रवास अजिबातच सोपा नव्हता.त्याच्यावर घरातल्या सदस्यांनी प्रचंड टीका केली. अगदी विकास आणि त्याच्या मैत्रीवरून तर रोज राडे होत होते. कधी किरण ला कपटी बोललं गेलं तर कधी स्वार्थी. एक वेळ अशी आली की विकासनेही किरणची साथ सोडली. पण ५२ वर्षांचा हा स्पर्धक दमला नाही, हताश झाला नाही की मागे वळला नाही. किंबहुना अधिक जिद्दीने खेळून शेवटच्या आठवड्यात आला आणि टॉप ६ खेळाडूंमध्ये त्याचे नाव जाहीर झाले.

या शेवटच्या आठवड्यात बिग बॉस सहाही स्पर्धकांचा आजवरचा प्रवास दाखवत आहेत.त्यांचे अभिनंदन करत आहेत.यासाठी बिग बॉसच्या घरातच एक खास सेट उभारण्यात आला आहे, जिथे तो स्पर्धक येताच रोषणाई होते, फटाके फुटतात आणि त्याचे जंगी स्वागत होते. असेच स्वागत काल किरण मानेचे झाले.

यावेळी बिग बॉसने साताऱ्याचा बच्चन अशी किरण मानेची ओळख सांगितली.या प्रसंगी किरण माने प्रचंड भावूक झाला. भाग गेला क्षीण गेला.. अवघा झाला आनंद अशा अभागांच्या ओळीतून त्याने आजवरचा त्याचा प्रवास उलगडला. शिवाय मला ऑस्कर जरी मिळाला तरी मी त्या स्टेजवरुनही हेच सांगेन की 'बिग बॉस'माझे गॉड फादर आहेत.ही म्हणताना तो प्रचंड रडला. असा किरण माने पहिल्यांदाच सर्वांनी पाहिला.पण सर्वच स्पर्धक तोडीस तोड असल्याने आता ट्रॉफी नक्की कुणाकडे जाणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Billion Dollar Build : करोडपती व्हायचंय? AI वापरुन आठ दिवसांत बनवा कंपनी अन् मिळवा ९ कोटींचं बक्षीस, काय आहे स्पर्धा? जाणून घ्या

निरागस चिमुकल्यांचे फोटो, रक्ताने माखलेल्या बॅग अन् शूज; विमानात १६५ सीटवर हल्ल्याच्या आठवणी, इराणने अमेरिकेला दाखवला आरसा

Snake Found in Bike : भयंकर! दुचाकीच्या सीटखाली फणा काढून बसला होता 6 फुटी काळा नाग; रात्रीच्या वेळी घरच्यांची उडाली झोप, पुढे काय झालं?

Road Accident in Sinnar : जागरण गोंधळाचा कार्यक्रम आटोपून परतताना काळाचा घाला! सिन्नरमध्ये भीषण अपघातात चार जागीच ठार, दोघे जखमी

Success Story: मातीच्या कष्टातून वर्दीपर्यंतचा प्रवास; शेतमजुराच्या लेकरांनी नाव कमावलं... बहिण-भाऊ दोघेही बनले पोलिस

SCROLL FOR NEXT