kiran mane new post viral of his new marathi serial Sindhutai Majhi Maai on colors marathi  SAKAL
मनोरंजन

Kiran Mane: मालिका उथळ असतात, विवाहबाह्य संबंध यापलीकडे.. किरण मानेंच्या नवीन पोस्टची एकच चर्चा

किरण माने यांनी मराठी मालिकेविषयी आणि नवीन मालिकेविषयी सुचक पोस्ट लिहीली आहे.

Devendra Jadhav

Kiran Mane on Marathi Serial News: किरण माने बिग बॉस मराठी 4 मधुन चर्चेत आले. किरण माने लवकरच मराठी मालिकेत झळकणार आहेत. ही मालिका म्हणजे 'सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची'. कलर्स मराठीवर लवकरच मालिका सुरु होणार आहे.

या मालिकेत किरण माने कोणती भुमिका साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण या निमित्ताने किरण माने यांनी मराठी मालिकेविषयी आणि नवीन मालिकेविषयी सुचक पोस्ट लिहीली आहे.

(kiran mane new post viral of his new marathi serial Sindhutai Majhi Maai on colors marathi )

किरण माने लिहीतात.. प्रेक्षकहो, तुमचा माझ्यावर असलेला विश्वास मी कधीच तोडणार नाही. आता माझी ही जी कलाकृती येतेय... ती तुमचे मनोरंजन तर करेलच, पण तुमचं आयुष्य समृद्ध करणारं खूप मोलाचं काहीतरी देण्याची ताकदही यात असणार आहे, याची मी तुम्हाला खात्री देतो.

'मालिका उथळ असतात', 'सासु-सून, नणंद-भावजया यांच्यातला कलह किंवा विवाहबाह्य संबंध यापलीकडे मालिकांना विषय नसतात' अशा तक्रारी कायम केल्या जातात. त्यात तथ्यही आहे.

पण आता या सगळ्या चौकटी मोडून-तोडून प्रेक्षकांना एक अस्सल, आशयघन, प्रभावी आणि काळजाला स्पर्श करणारं काहीतरी देण्याचा प्रयत्न 'सिंधुताई माझी माई' या मालिकेतून केला आहे.

किरण माने पुढे लिहीतात.. या सिरीयलमध्ये टीआरपीच्या आहारी जाऊन खोटे ड्रामे भरले जाणार नाहीत. या सिरीयलमध्ये कथानकात पाणी घालून ते पसरट केले जाणार नाही.

या सिरीयलच्या चित्रीकरणापासून दिग्दर्शनापर्यन्त आणि लेखनापासून अभिनयापर्यन्त सगळ्या गोष्टी, तुम्हाला एखादा दर्जेदार सिनेमा पहात असल्यासारखा आनंद देतील !

किरण माने शेवटी लिहीतात.. तुम्ही, विशेषत: ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य प्रेक्षकांनी मला लावलेला अतोनात जीव, हे माझं बळ आहे. एक अभिनेता म्हणून मला तुमचं प्रचंड प्रेम लाभलंय.

चाहत्यांचं हे प्रेम सार्थ ठरावं यासाठी, या जगावेगळ्या मालिकेतली एक अफलातून भुमिका मी समरसून, तनमन अर्पून साकारण्याचा प्रयत्न करतोय...

'सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची' ही नवी मालिका १५ ऑगस्टपासून सं. ७ वा. आवर्जुन कलर्स मराठीवर पाहता येईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT