kiran mane post for shah rukh khan jawan showtimings songs dialogues SAKAL
मनोरंजन

Jawan Release: 'जवान' बघायला मुहूर्त सापडेना.. किरण मानेंची खास पोस्ट चर्चेत

किरण मानेंना जवान बघायचाय पण त्यांना समस्या आहे

Devendra Jadhav

Jawan News: शाहरुखचा जवान बॉक्स ऑफीसवर तुफान हिट झालाय. अवघ्या २ दिवसात जवानने रेकॉर्डब्रेक कमाई केलीय. जवान पाहायला भारतातले असंख्य थिएटर्स हाऊसफुल्ल झाले आहेत.

जवान पाहण्यासाठी असंख्य सेलिब्रिटी सुद्धा थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. अशातच मराठमोळे अभिनेते किरण मानेंनी 'जवान' बघायला मुहूर्त सापडेना.. अशी पोस्ट केलीय. काय म्हणाले किरण माने बघूया.

(kiran mane post for shah rukh khan jawan showtimings songs dialogues)

किरण मानेंना जवान बघायचाय पण...

किरण माने यांनी सोशल मिडीयावर एक पोस्ट केलीय. या पोस्टमध्ये किरण माने यांनी त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केलीय. या प्रोजेक्टचं नाव अजुन ठरलं नसलं तरीही किरण माने या सिनेमात महत्वाची भुमिका साकारणार आहेत.

किरण माने क्लॅप फोटो शेअर करुन लिहीतात..."नागपूर ! विदर्भात कोकण उभं केलंय.
नवी भुमिका, नवी ऊर्जा. नवनविन प्रोजेक्टस् चे मुहूर्तावर मुहूर्त चाललेत याटा आनंद आहे... पण 'जवान' बघायला मुहूर्त सापडेना याची हूरहूर आहे."

एकुणच व्यस्त वेळापत्रकामुळे किरण मानेंना जवान बघायला मुहूर्त सापडत नाही असं बोललं जातंय.

शाहरुखचा जवान हिट पण अभिनेता का ट्रोल?

ट्विटरवर शाहरुख खानने अहमदाबादमधील एका चाहत्यांच्या ग्रुपने प्रतिक्रिया दिली. या ग्रुपने शाहरुखच्या थिएटरबाहेरच्या मोठ्या पोस्टरवर दुधाचा अभिषेक केला. या हृदयस्पर्शी कृतीने किंग खान खूप भारावला होता. त्या ग्रूपचं कौतुक करण्यापासून तो स्वत:ला रोखू शकला नाही.

शाहरुखसारख्या सुपरस्टारने दुधाची नासाडी करणाऱ्या चाहत्यांना थांबवायला हवं होतं मात्र उलट तो त्यांचे कौतुक करत आहे. असं म्हणत अनेकांनी त्याला ट्रोल केलं.

जवानची बॉक्स ऑफीसवर जबरदस्त ओपनिंग

जवानने बॉक्स ऑफीसवर सुद्धा जबरदस्त ओपनिंग केली. पहिल्या दिवशी जबरदस्त ओपनिंग देणाऱ्या या चित्रपटाची कमाई दुसऱ्या दिवशी कमी झाली असली तरी या चित्रपटाने 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे.

SACNILK ने दिलेल्या अहवालानुसार, जवानाने दुसऱ्या दिवशी 53 कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. जवानने पहिल्या दिवशी 75 कोटींची कमाई करत सुपरहिट ओपनिंग दिली. या कमाईसोबतच हा चित्रपट बॉलिवूडचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

त्यामुळे आता दोन्ही दिवासाचे कलेक्शन पाहता जवानने आता 127.50 कोटींची कमाई केली आहे. वीकेंडला हे कलेक्शन नक्कीच वाढणार अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinhagad Road Traffic Jam : पुण्यातील सिंहगड रोडवर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा, ऑफिसच्या दिशेने निघालेल्यांना मनस्ताप

Mumbai CNG Shortage: सीएनजी कोंडीतून मुंबईकरांची सुटका, पुरवठा सुरळीत होताच पंपांवर गर्दी; ३ दिवसात कोट्यवधींचं नुकसान

Latest Marathi Breaking News Live Update : 'आमच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड सर्वसंमतीने केली जाईल'- भाजप नेते तारकिशोर प्रसाद

'दादा फक्त तुमच्यामुळं शक्य झालं...' गृहप्रवेशानंतर सुरजने मानले अजित पवारांचे आभार, दादांनी कमेंट्स करत दिल्या हटके शुभेच्छा

भाजपकडून तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातल्या आरोपीला नगराध्यक्षपदाची उमेदवारी, अटकेनंतर होता तुरुंगात, सध्या जामीनावर बाहेर

SCROLL FOR NEXT