kiran mane praised Manoj Jarange patil for his Rajdhani Satara sabha SAKAL
मनोरंजन

Manoj Jarange: राजधानी सातार्‍यातली सभा राजासारखी, जरांगे पाटलांसारखं कोणत्याही नेत्याला जमणार नाही, अभिनेत्याने केलं कौतुक

मनोज जरांगेंच्या पाटलांच्या सभेचं किरण मानेंनी कौतुक केलंय

Devendra Jadhav

मनोज जरांगेंचा सध्या महाराष्ट्र दौरा आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगेंना महाराष्ट्रभर सभा घेत लोकांना संबोधित करत आहेत.

मनोज जरांगेंची साताऱ्यात सभा झाली. त्यावेळी अभिनेते किरण माने यांनी जरांगेंचं कौतुक करणारी एक पोस्ट शेअर केलीय. काय म्हणाले माने? बघूया.

(kiran mane praised Manoj Jarange patil for his Rajdhani Satara sabha)

किरण मानेंनी सभेचा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओखाली किरण माने लिहीतात, "जरांगे पाटलांची राजधानी सातार्‍यातली सभा राजासारखी झाली... देखणी... रूबाबदार. मी खेडेगांवात लहानाचा मोठा झालोय. राजकीय नेत्यांसाठी सभेला गर्दी जमवणं किती सहजशक्य असतं, हे मी डोळ्यांनी पाहिलंय. कशा जीपा,ट्रक,टेम्पो भरून माणसं सभेला नेली जातात... कशा घोषणा दिल्या जातात. त्यानंतरच्या पार्ट्या, दारू सगळं माहितीय... अशा परिस्थितीत एका सर्वसामान्य माणसाच्या सभेला उत्स्फूर्तपणे, मनापास्नं, स्वत:हून घरातनं उठून सभेला जाऊन बसणारी माणसं बघायला मिळताहेत. भर उन्हात, रात्री दोन-दोन वाजेपर्यन्त त्याची वाट पहातात. हे कुठल्याही नेत्याला आजच्या काळात शक्य नाही."

किरण माने पुढे लिहीतात, "...मी सातारचं जरांगे पाटलांचं भाषण पूर्ण ऐकलं. जेवढ्या तळमळीनं लोक येतात, तेवढ्याच मनापासून, नितळ, स्पष्ट, परखड, सडेतोड बोलणारा आणि वागणारा हा माणूस आहे. आरक्षणाविषयी सगळी कायदेशीर माहीती आहे. आरक्षणाचा लाभ घेणार्‍या इतर वर्गांविषयी जराही कटुता त्यांच्या मनात नाही. द्वेषभावना न पसरवता, 'इतर जातीजमातींना दुखवू नका. ही नेत्यांनी निर्माण केलेली दुफळी आहे. मनातून आपण सगळे जातीधर्माचे लोक एक आहोत.' असा सूर भाषणात असतो, जो आश्वासक आहे."

किरण माने शेवटी लिहीतात, "संविधान दिन जवळ आलाय. त्याचवेळी एका सामान्य नागरीकाच्या नेतृत्वाखाली, कुठल्याही राजकीय पाठबळाशिवाय, संविधानिक मार्गाने एक भव्यदिव्य आंदोलन उभं रहाणं ही खूप प्रेरणादायी घटना आहे. जय शिवराय... जय भीम."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

Gram Panchayat Delimitation: प्रभागरचनेचे काम, तलाठ्यांना घाम ; ग्रामपंचायतीकडेच सोपवा; संघटनेची महसूल विभागाकडे मागणी

Laxman Hake: ओबीसी आरक्षणासाठी मोठा एल्गार! लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा; मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

15000 Teacher Recruitment : TET ची अट रद्द! राज्यात 15 हजार शिक्षकांची मेगा भरती; 600 क्रीडा शिक्षकांसाठी स्वतंत्र पात्रता निकष जाहीर, ऑनलाईन मागविले अर्ज

SCROLL FOR NEXT