Kiran Mane shared post about colors marathi award with sumeet raghvan sakal
मनोरंजन

Kiran Mane: आजपर्यंत कुठल्याही पुरस्कार सोहळ्यात मी.. किरण माने पहिल्यांदाच करणार 'ही' गोष्ट..

अभिनेते किरण माने यांची पोस्ट चर्चेत..

नीलेश अडसूळ

Kiran Mane: यंदाच्या बिग बॉसच्या चौथ्या पर्वात किरण माने सहभागी झाले होते. वयाच्या ५२ व्या वर्षी साताऱ्यातल्या बच्चन किरण मानेंनी जबरदस्त खेळ खेळून बिग बॉस मराठी ४ मध्ये टॉप ३ पर्यंत मजल मारली. प्रेक्षकांच्या मनात त्यांनी वेगळंच स्थान निर्माण केलं.

त्यामुळे गेली काही दिवस किरण माने बरेच चर्चेत आहेत, सुरवातीला वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे किरण माने आता मात्र त्यांची प्रतिमा पूर्ण बदलली आहे. मुंबईत सह ग्रामीण भागात त्यांची प्रचंड हवा आहे.

किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सातत्याने ते काहीना काही पोस्ट करत असतात. आज त्यांनी कलर्स मराठी अवॉर्ड बाबत एक पोस्ट शेयर केली आहे.

(Kiran Mane shared post about colors marathi award with sumeet raghvan)

किरण माने सध्या कलर्स मराठी वरील एक महत्वाचा चेहरा झाले आहेत. त्यामुळे बिग बॉस नंतर आता ते कलर्स मराठी अवॉर्ड मध्येही झळकले. या सोहळ्यातही त्यांचा सातारी बाणा त्यांनी दाखवून दिला.

पण एरव्ही खोचक टीका करणारे माने यंदा मात्र, चक्क कॉमेडी करताना दिसले. त्यांचा हा बाज सगळ्यांनाच आवडून गेला. यावेळी सुमीत राघवन देखील किरण माने यांच्यासोबत होता. सुमित म्हणाला, हल्ली किरणची इतकी हवा आहे.. की 'धनंजय माने इथेच राहतात का? ' हा फेमस डायलॉग आता 'किरण माने इथेच राहतात का ? 'असा झाला आहे. यावेळी किरणने विनोद करून सर्वांना हसवले, तोच अनुभव त्याने शेयर केला आहे.

किरण माने यांनी पोस्ट शेयर करत लिहिले आहे की, ''ओ माने, यावेळी कलर्स मराठी ॲवाॅर्डस् मध्ये एक फनी गॅग कराल का? सुमीत राघवन आहे सोबत..." कलर्समधनं आमचा जिगरी दोस्त आनि भारी माणूस प्रथमेश देसाईचा फोन आला... लग्ग्गेच होकार दिला.''

''आजपर्यन्त डान्स लै वेळा केला होता...पण कुठल्याही मोठ्या ॲवाॅर्ड फंक्शनमध्ये मी कधीच स्कीट किंवा कुठलं विनोदी सादरीकरण केलं नव्हतं. करायची इच्छा होती. त्यात माझा आवडता अभिनेता सुमीत सोबत होता... आशिष पाथरे तर लै पूर्वीपासूनचा फेवरेट. म्हन्लं हून जाऊ दे ! लै मज्जा आली. बघा...''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: तलाठी अन् गट 'क' पदांसाठी घेतली जाणारी परीक्षा आता थेट पुढच्या वर्षी! जाणून घ्या नवी तारीख

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Gold Rate Today: सणाआधी सोन्याच्या भावात मोठा बदल! खरेदीआधी पाहा तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचा ताजा भाव

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

SCROLL FOR NEXT