Kiran Mane shared post about hakim chacha role in ravrambha movie and vilas patil in mulgi zali ho serial
Kiran Mane shared post about hakim chacha role in ravrambha movie and vilas patil in mulgi zali ho serial sakal
मनोरंजन

Kiran Mane: माझ्या डोळ्यादेखत त्यांनी 'विलास पाटील'चा खून केला.. किरण मानेंच्या पोस्टनं खळबळ..

नीलेश अडसूळ

kiran mane: किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सातत्याने ते काहीना काही पोस्ट करत असतात. ते आज मनोरंजन विश्वात भक्कम उभे असले तरी त्यामागे त्यांचा प्रचंड मोठा संघर्ष आहे. अनेक वर्षे मालिका, चित्रपट, नाटक करून त्यांनी नाव लौकिक मिळवला आहे.

किरण माने यांना बिग बॉस मराठी नंतर खऱ्या अर्थाने मोठी प्रसिद्धी मिळाली. सध्या त्यांचा फॅन क्लब जबरदस्त वाढला आहे. किरण माने सध्या 'रावरंभा' या ऐतिहासिक चित्रपटातून आपल्या भेटीला आले आहेत. याच निमित्ताने त्यांनी एक मोठा खुलासा केला आहे.

(Kiran Mane shared post about hakim chacha role in ravrambha movie and vilas patil in mulgi zali ho serial)

किरण माने यांची मुलगी झाली हो.. ही मालिका सर्वांना ठाऊक आहेच. या मालिकेतून त्यांना एकाएकी काढून टाकण्यात आलं मोठा गदारोळ माजला होता. अगदी राजकीय वळण या घटनेला मिळाले होते. त्यांचे विलास पाटील हे पात्र एवढे गाजले होते की, त्यांना जणू नवी ओळखच मिळाली होती. त्याच गोष्टीचे स्मरण त्यांनी आज पुन्हा एकदा करून दिले आहे.

या पोस्ट मध्ये त्यांनी लिहिले आहे की. ''..त्यावेळी ही छोटी पण महत्त्वपूर्ण भुमिका माझ्यासाठी लाखमोलाचा आनंद देणारी ठरली होती. वाढती लोकप्रियता डोळ्यांत खुपल्यामुळे काही कारस्थान्यांनी माझ्या डोळ्यादेखत माझ्या 'विलास पाटील'सारख्या दिलदार, दिलखुलास, रांगड्या व्यक्तीरेखेचा खून केला होता...''

''मी सैरभैर झालो होतो. अन्यायाविरोधात पेटुन उठलो होतो. त्याचवेळी कुठूनतरी एखादा फ़रिश्ता यावा तसा हा 'हकीमचाचा' अलगद माझ्याजवळ आला. म्हणाला, "चल दोस्ता, चार पावलं सोबतीनं चालूया..." चार दिवस हकीमचाचा माझ्या शरीरात वास्तव्याला होता... त्यानं नकळत कसली दवा दिली ख़ुदा जाने... माझा मेंदू, माझं मन एकदम शांत झालं.''

''...'रावरंभा' सिनेमात रावजी नांवाच्या अनोळखी मावळ्याची 'अनसुनी दास्तान' सांगीतलीय... याच मावळ्याला एका बिकट वळणावर हा हकीमचाचा भेटतो.. छत्रपती शिवरायांचा गुप्तहेर, बहिर्जी नाईकांचा चेला... तेज़-नज़र, जिगरबाज वृत्ती असलेला हकीमचाचा जणू काही रावजीलाही म्हणतो, "चल दोस्ता, चार पावलं सोबतीनं चालूया." ...आणि रावजीला त्याची जान 'रंभा' परत मिळवून देतो !''

''गेस्ट अपिअरन्स असूनही ही भुमिका कायम माझ्या काळजाच्या जवळ राहील. ज्या काळात मी या सिनेमाचं शुटिंग करत होतो त्याकाळात मी आयुष्यातली एक मोठ्ठी लढाई लढत होतो. त्यावेळी त्या लढाईसाठी वेगळंच बळ या चाचानं दिलं मला. '' अशी पोस्ट किरण माने यांनी शेयर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

SCROLL FOR NEXT