Kiran Mane shared post about his first photoshoot in life for amitabh bachchan corporation limited sakal
मनोरंजन

Kiran Mane: सातारचा बच्चन किरण माने यांचं पहिलं फोटोशूट अमिताभ यांनीच केलं होतं रिजेक्ट..

किरण माने यांनी सांगितला अमिताभ बच्चन यांच्या कंपनीचा अगदी खास अनुभव..

नीलेश अडसूळ

kiran mane: अभिनेते किरण माने हे नाव मराठी मनोरंजन विश्वात कुणाला माहीत नाही असं कुणीही नसेल. आपल्या दमदार अभिनयाने आणि तितक्याच वादग्रस्त गोष्टींमुळे चर्चेत असणारे किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात.

'बिग बॉस मराठी'त सालीम झाल्यानंतर त्यांच्या प्रसिद्धीत प्रचंड वाढ झाली आहे. ते आज मनोरंजन विश्वात भक्कम उभे असले तरी त्यामागे त्यांचा प्रचंड मोठा संघर्ष आहे. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून ते इथपर्यंत आले आहेत. त्याच प्रवासातला एक किस्सा त्यांनी शोषयाल मीडियावर शेयर केला आहे.

या पोस्ट मध्ये आयुष्यातलं पहिलं फोटोशूट, त्याला झालेला विरोध, आलेल्या अडचणी आणि एवढं करूनही मिळालेलं रिजेक्शन याविषयी ते बोलले आहेत.

किरण माने म्हणाले, ''आयुष्यातलं पहिलंवहिलं फोटोशूट... वीसबावीस वर्ष उल्टुन गेली या गोष्टीला. एक दिवस एक खत्तरनाक बातमी आली पेपरात ! 'अमिताभ बच्चन काॅर्पोरेशन लिमीटेड'तर्फे भारतभरातून अभिनेते निवडणार आहेत. 'ज्यांना अभिनयात करीयर करायचंय त्यांनी आपापले फोटोज पाठवा. त्यातून निवड करुन, त्यांच्या आॅडीशन्स घेऊन त्यातले दहा जण निवडणार. आणि त्यांना त्यांच्या फिल्मस् मधून लाँच करणार'... आगायायायाया..मग काय ! लागलो कामाला.''

''...पशा म्हन्ला "ऐ किरन्या सातार्‍यात लै भंगार फोटू काढत्यात. कोल्हापूरला राजारामपुरीत येक नंबर स्टुडिओय. तिथं जाऊन काढूया." निघालो कोल्हापूरला. यावरुन घरात चिडचीड. घरातून भांडून निघालो. कोल्हापूरला गेलो आणि फोटो काढले. सातार्‍यात पन्नास रूपयांना एक काॅपी मिळायची. दहा फोटो काढू म्हणून पाचशे रूपये घेतले सोबत.''

''तिथे गेल्यावर एका फोटोचे पाचशे रूपये मागायला लागले. मग 'काय राव, लै लांबनं आलूय राव.' असं करुन सातशे रूपयात दोन फोटो काढले. वरचं दोनशे पशानं दिलं. फोटो बघून पशा म्हन्ला "नादखुळाच ! जाहिरातीतले माॅडेल झक मारत्याल लगा. बच्चन येडा हुईल भावा तुझा फोटू बघून."

''... ABCL ला फोटो पाठवले. परत रिप्लायच आला नाही. अर्थातच रिजेक्ट झाले असणार. लै वाट बघितली. एक दिवस 'चंदेरी' मध्ये बातमी आली. त्यांनी दहा अभिनेते निवडले होते. त्यात मी नव्हतो. अर्रर्रर्र लै वाईट वाटलं गड्याहो. पुढं वाचलं, निवड झालेल्यांना पोहणे, घोडेसवारी, तलवारबाजी आणि अभिनय वगैरे प्रशिक्षण देऊन कंपनी त्यांच्या फिल्मस् मध्ये लाँच करनार होती...मंग तर लै लै लैच वाईट वाटलं.''

''पशा न् मी चारभिंतीवर गेलो. दोन बियर मारल्या आन "येक ना येक दिवस मी त्या दहा पोरांपेक्षा मोठ्ठा ॲक्टर हुन दाखवीन. ॲवाॅर्ड गोज टूS वन ॲन्ड ओन्ली द किरSSSन मानेS" आसं सगळ्या सातार्‍याला ओरडून ओरडून सांगीतलं !''

''नंतर काही दिवसांनी 'चंदेरी'त बातमी आली...कंपनीचं दिवाळं निघालं आणि ABCL बंद पडली. पन तरीबी वाईट वाटलं बरका... बच्चनसायबांसाठी !.. त्या फोटोशूटमधले तेच हे दोन फोटो ! आज सापडले. खूप हसलो फोटो बघून...'' असा अनुभव किरण माने यांनी सांगितला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 News: खेळाडू की मार्गदर्शक? CSK ने MS Dhoni ची भूमिका जाहीर केली; मुख्य प्रशिक्षकपदी झहीर खान बसताच मोठी घोषणा

Miraj Government Hospital RCC Slab Collapse : माणुसकी धावून आली अन् ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या 7 कामगारांचा बचावला जीव; मिरजेत अंगावर काटा आणणारं दृश्य

लाज वाटत नाही?... जुई गडकरीचा डीपफेक VIDEO व्हायरल; सुपरस्टार मराठी कपलच्या मुलासोबत जोडलं नातं, कोण आहे तो?

Marathi News Live Updates : राम मंदिर देणगी चोरी प्रकरणातील आरोपींच्या जामिनावर आज सुनावणी

Solapur Politics: ‘नातू’ शिकवू लागले, पण ‘आजोबा’ आजोबाच! अमोल शिंदेंचा देशमुखांच्या भाजपअंतर्गत विरोधकांना टोला; चंद्रकांतदादांचे ‘देर है, अंधेर नहीं’

SCROLL FOR NEXT