Kiran Mane shared post about his old marathi drama natak perfect mismatch with actress amruta subhash  sakal
मनोरंजन

Kiran Mane: जस्ट वेट ॲन्ड वाॅच.. किरण माने यांनी पोस्ट शेयर करत दिला इशारा..

अभिनेते किरण माने यांनी सात वर्षापूर्वीची आठवण सांगत केली नवी घोषणा..

नीलेश अडसूळ

Kiran Mane: गेली काही दिवस किरण माने बरेच चर्चेत आहेत, सुरवातीला वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे किरण माने सध्या बिग बॉस मुळे चर्चेत आहे. मुंबईत सह ग्रामीण भागात त्यांची प्रचंड हवा आहे.

यंदाच्या बिग बॉसच्या चौथ्या पर्वात किरण माने सहभागी झाले होते. वयाच्या ५२ व्या वर्षी साताऱ्यातल्या बच्चन किरण मानेंनी जबरदस्त खेळ खेळून बिग बॉस मराठी ४ मध्ये टॉप ३ पर्यंत मजल मारली. प्रेक्षकांच्या मनात त्यांनी वेगळंच स्थान निर्माण केलं

किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सातत्याने ते काहीना काही पोस्ट करत असतात. आज त्यांनी एक पोस्ट करत थेट 'जस्ट वेट अँड वॉच'चा इशाराच दिला आहे..

हा इशारा कोण्या धमकीचा नाही तर एका नव्या घोषणेचा आहे. किरण माने यांनी सात वर्षापूर्वीची आठवण शेयर करत काहीतर नवं येत असल्याची माहिती दिली आहे.

या पोस्ट मध्ये त्यांनी लिहिलं आहे की, ''सात वर्षांपूर्वी मी केलेल्या नाटकाची गोड आठवण वर आली आज. फ्लॅशबॅक. नाटकात दोनच पात्रं...

जयंत ! वय पंचेचाळीस. सातारी गावरान रांगडा गडी. जुन्या बिल्डींग डिमाॅलीश करण्याचा व्यवसाय असलेला 'ब्रेकिंग काॅन्ट्रॅक्टर'. लाख्खो रूपये कमावणारा, पण लग्नाचं वय उलटून गेलं तरी लग्न न झालेला. भला माणूस. लग्न करून चारचौघांसारखा संसार थाटावा अशी लै इच्छा असूनही, आता सगळी आशा सोडलेला...

प्राची ! वय अडतीस. पुण्यात एकदम पाॅश सोसायटीत रहाणारी माॅडर्न, बोल्ड, बिनधास्त मुलगी. लग्नाचं वय उलटलंय, पण 'लग्न करायचंच नाही' असं ठामपणे ठरवलंय तिनं. पुरूषद्वेष्टी. सगळे पुरूष एकजात सारखेच. आपमतलबी. शरीराची गरज म्हणून लग्न करणारे. त्यापलीकडेही स्त्रीला काही हवं असतं याचा विचार न करणारे. "टिपिकल बुळ्या पोरींसारखं एखादं बुजगावणं पकडायचं आणि 'मिस यू जानू लव्ह यू पिल्लू' करत जन्म काढायचा....टिकल्या लावायच्या. हळदीकुंकवं करायची. त्यापेक्षा एकटं राहिलेलं बरं."

''...अशी ही जगावेगळी प्राची दरवर्षीप्रमाणं एकटीच बुलेटवरुन फिरायला निघते. बामणोलीला येते. एक रिमोट, ऑफ सिझन असल्यामुळं गर्दी नसलेलं शांत रिसाॅर्ट बुक करते. मस्त जंगलात फिरायचं, फोटोज काढायचे...शांतता अनुभवून ताजंतवानं व्हायचं, असं ठरवून.''

''योगायोगाने जयंतही तिथं येतो. त्याच रिसाॅर्टच्या वरचा मजला डिमाॅलीश करायचं काम असल्यामुळं... दोघंही अनपेक्षितपणे एकमेकांना जोरदार भिडतात...भांडणं होतात. बेक्कार ठिणग्या उडतात. पण त्याच रात्री एक अशी भन्नाट, जबराट गोष्ट घडते की दोघंही मुळापासून हादरतात... पायाखालची जमीन सरकते... पूर्वी कधीच झाली नाही, अशी 'आतमध्ये' काहीतरी हलचल होते... आणि वरकरणी 'परफेक्ट मिसमॅच' वाटणार्‍या या दोघांत दोनच दिवसांत एक तरल, नाजूक, सुंदर नातं बहरू लागतं...''

''अभिनेता आणि अभिनेत्री म्हणून लै लै लै समाधान देणारं हे द्विपात्री नाटक. हिमांशू स्मार्तनं लिहीलेलं.. मी आणि अमृता सुभाषनं सादर केलेलं. सात वर्षांनंतर रिफ्रेश बटन दाबण्यासाठी हे नाटक पुन्हा एकदा करावंसं वाटतंय... प्लॅन सुरूय... जस्ट वेट ॲन्ड वाॅच..'' अशी पोस्ट करत किरण माने लवकरच रंगभूमीवर येणार असा इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT