Kiran Mane shared post about his struggle fortune and nisarg hotel memory sakal
मनोरंजन

Kiran Mane: ज्या हॉटेलात खाण्यासाठी पैसे नव्हते त्याच हॉटेलाचं केलं उद्घाटन.. किरण माने म्हणाले, आयुष्य..

नशीब कसं बदलतं बघायचं असेल तर किरण माने यांची ही पोस्ट बघाच..

नीलेश अडसूळ

kiran mane: किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सातत्याने ते काहीना काही पोस्ट करत असतात. ते आज मनोरंजन विश्वात भक्कम उभे असले तरी त्यामागे त्यांचा प्रचंड मोठा संघर्ष आहे. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून ते इथपर्यंत आले आहेत. याच संघर्षातला किस्सा त्यांनी सोशल मीडियावर शेयर केला आहे. प्रयत्न केले तर नशीब कसं बदलतं याचा उत्तम दाखला किरण यांच्या पोस्ट मधून दिसतं.

(Kiran Mane shared post about his struggle fortune and nisarg hotel memory)

किरण माने म्हणतात, 'आयुष्य कवा-कवा लै भन्नाट जादू दाखवतं ! संघर्षाच्या काळात पैशांची लै चनचन असायची. दूबेजींचा सल्ला 'सर ऑंखो पर' ठेवून नाटकवेड्या पोरांच्या अभिनय कार्यशाळा घेऊन पोटापुरतं कमावत होतो. कमवायचं,खर्चायचं आणि जगायचं तर 'अभिनया'तनंच, ही खूणगाठ मनाशी पक्की केलीवती.'

तर पुढे ते म्हणतात, ''...तर मुद्दा असा की, त्यावेळी हायवेवर 'निसर्ग' नांवाचं नविन हाॅटेल झालंवतं. तिथला 'गावरान खेकडा' ही डिश लै फेमस झालीवती. वर्कशाॅपमधली पोरं त्याबद्दल सांगायची. मी मुळात खवय्या. माझी तिथं जाऊन खायाची इच्छा व्हायची पन परिस्थितीमुळं मन मारायचो.''

''पोरांच्या हे लक्षात आलं. मग काय ना कायतरी निमित्त काढून, सगळे काॅन्ट्रीब्यूशन काढून वरचेवर मला तिथं घेवून जायला लागले. "मनसोक्त हाना सर, ढिलं पडू नका." असं म्हनून प्रेमानं खाऊ घालायला लागले. लै मनसोक्त ताव मारायचो मी.''

''...पंध्रावीस वर्ष उलटून गेली या गोष्टीला. काल गुढी पाडव्याला त्याच हाॅटेलच्या एका शाखेचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं ! वाढे फाट्यावर 'निसर्ग'ची एक शाखा सूरू झालीच आणि त्याचबरोबर 'निसर्ग लाॅजिंग'ही सुरू झालं. प्रमुख पाहूणा म्हणून माझं स्वागत होत-होतं... मी रिबिन कापत होतो आणि माझ्या डोळ्यासमोर सगळा फ्लॅशबॅक तरळून मागे जात होता.

'' हाॅटेलमालक राजूशेठ नलावडे यांनी वीस वर्ष पदार्थांची 'चव' राखली आणि त्या जोरावर प्रगती केली. कठोर संघर्षातनं, विपरीत परिस्थितीवर मात करुन आपलं ध्येय गाठण्याचं रहस्य हेच आहे - आपल्या कामातली 'चव राखणं' !'' अशी पोस्ट किरण माने यांनी केली आहे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gutkha Ban: आता गुटखा विक्रेत्यांची खैर नाही! फक्त बंदी नाही, थेट मकोका...; महाराष्ट्र सरकारचा मोठा धडाका

Who is Rajan Patil : अजित पवारांचा डाव उधळणारा पठ्ठ्या! अनगरच्या रणांगणातून राजकीय ठिणगी पेटवणारे राजन पाटील कोण?

Viral Video: मलायका अरोराचा हटके स्टंट! स्पर्धकाच्या डोक्यावर ठेवला गॅस, अन् बनवला चहा, व्हिडिओ चर्चेत

Rahul Gandhi: ''राहुल गांधी निवडणूक आयोगाला बदनाम करत आहेत'', देशातल्या 272 दिग्गजांनी लिहिलं खुलं पत्र

Maharashtra CET Exam: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! आता CET परीक्षा वर्षातून तीनदा होणार, वाचा नवीन नियम

SCROLL FOR NEXT