Kiran Mane shared post about satara hirkani mahotsav
Kiran Mane shared post about satara hirkani mahotsav sakal
मनोरंजन

Kiran Mane: म्हणून मी भल्या-भल्यांना त्यांची जागा दाखवू शकलो.. किरण माने यांचं पुन्हा मोठं विधान..

नीलेश अडसूळ

kiran mane: सातारचा बच्चन म्हणून ओळखले जाणारे अभिनेते म्हणजे किरण माने. ते कायमच साताऱ्या विषयी भरभरून बोलत असतात. अगदी बिग बॉस च्या घरात असताना ते सातारच्या आठवणी, सातारचा माज याविषयी बोलायचे. आज पुन्हा त्यांनी सातारच्या माणसांविषयी एक पोस्ट लिहिली आहे.

एका सत्काराच्या निमित्ताने त्यांना बोलावण्यात आले होते. यावेळी तिथे आलेला अनुभव, सातारच्या लोकांचा स्वभाव आणि किरण माने यांना आलेला अनुभव त्यांनी सांगितला आहे.

किरण माने लिहितात की, ''सातारकर भावाबहिणींची माझ्यावरची माया अजब हाय भावांनो. काही केल्या आटत नाही. कितीही झालं तरी शेवटी राजधानीची माती. नादच करायचा नाय.''

(Kiran Mane shared post about satara hirkani mahotsav)

''सातारी माज.. जसा रांगडेपणानं ठोसेघरच्या धबधब्यासारखा अंगावर येतो, तसंच 'सातारी प्रेम'बी अक्षरश: गुदमरून टाकणार्‍या महाबळेश्वरच्या पावसासारखं धो धो बरसणारं... सातारकरांनी एकदा का ठरवलं, की आपल्या भावाचा सन्मान करायचा... की मग करायचाच ! ठरलं की ठरलं. मग मी बिझी आहे, सातार्‍यात नाही, अशी कारणं सांगून फायदा होत नाही...''


''खरं सांगू का? हे मला खूप आवडतं. माझ्या मातीतल्या माणसांचं माझ्यावर लक्ष आहे... त्यांच्या मायेचं कवच माझ्यावर आहे म्हणून तर भल्या-भल्यांना टक्कर देऊन त्यांची जागा त्यांना दाखवू शकलो. कितीबी संकटं आली तरी आज ताठ मानेनं उभा आहे...''

''सातार्‍यातल्या हिरकणी फाऊंडेशनच्या आमच्या सगळ्या बहिणीही अशाच अतिशय विपरीत परिस्थितीशी झगडा देत ताठ कण्यानं उभ्या आहेत ! कदाचित म्हणूनच त्यांच्या भव्यदिव्य 'हिरकणी महोत्सवा'त त्यांना माझा सत्कार करायचा होता.''

''मी बाहेरगांवी शुटिंगमध्ये बिझी आहे, हे कारण त्या ऐकायलाच तयार नव्हत्या. त्यांच्या वतीनं आसिफ खान यांनी मला अक्षरश: आग्रह करकरून तिथून आणलं. फटाक्यांच्या माळा लावून स्वागत केलं...''

पुढे किरण माने यांनी लिहिलं आहे की, ''आर जे सोनलनं 'मन सुद्ध तुझं गोष्ट हाये प्रिथवी मोलाची' हे गाणं माझ्यासाठी गायलं. स्टेजच्या पायर्‍या चढताना 'मै हूॅं डाॅन' गाणं लागलं आणि प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. माझा जोरदार सत्कार करून पुन्हा तितक्याच अगत्यानं सेटवर नेऊन सोडलंही. लै भारी वाटलं.''

''हिरकणी..च्या सर्वेसर्वा जयश्री शेलार या आर्थिक दुर्बल महिलांसाठी अफाट काम करतात. साताऱ्यातील पहिली 'पिंकॅथाॅन रन', पिंक रिव्हाॅल्यूशन कॅन्सर अवेयरनेस प्रोग्राम, कोविड काळात शेकडो रुग्णांसाठी ऑक्सिजन, औषधं, लसी मिळवण्यासाठी जिवाचं रान करणं, कोविडच्या हाहाकारात संसार उध्वस्त झालेल्या विधवा महिलांना स्वतःच्या पायावर उभं करणं अशा कामांची यादी संपता संपणार नाही. अशा महिलांनी आवर्जुन माझा सन्मान करणं हे माझ्या संघर्षासाठी खूप मोठं बळ देणारं आहे. सर्वांचे मनापासून आभार !'' अशा शब्दात किरण माने यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ठाकरेंकडून INDIA आघाडीच्या पंतप्रधानांच्या शपथविधीचं मोदींना निमंत्रण; म्हणाले, खुर्चीवर आहे तोपर्यंत...

Virat Kohli : विराट कोहली बीसीसीआयवर झाला नाराज; हा नियम रद्द करण्याची केली मागणी

Viral Video: संसदेमध्ये असला राडा कधीच पाहिला नसेल! सभागृहात खासदारांमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हिडिओ

Nashik Crime News : रेल्वे कर्मचाऱ्याकडूनच पानेवाडीत इंधनाची चोरी; 6 जण ताब्यात

Latest Marathi News Live Update : बिभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन प्रकरणाचा निर्णय कोर्टाने राखून ठेवला

SCROLL FOR NEXT