kiran mane shared post for mahesh manjrekar Bigg Boss Marathi 4 sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: मन आन पोट दोन्हीबी भरलं! किरण मानेची मांजरेकरांसाठी खास पोस्ट

मांजकरेकर किरण मानेला धारेवर धरत असले तरी त्याने मांजरेकरांविषयी प्रेम व्यक्त केले आहे.

नीलेश अडसूळ

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरातील एक वादग्रस्त नाव म्हणजे किरण माने. बाहेरच्या जगात आपल्या राजकीय विचारांनी आणि मालिकेतील वादामुळे गाजलेला हा चेहरा गेली चाळीस दिवस बिग बॉस मराठीच्या घरात आहे. 'बिग बॉस मराठी' या बहुचर्चित आणि लोकप्रिय खेळात तो सहभागी झाला असून अद्यापही घरात टिकून आहे. त्याच्या स्वभावामुळे आणि वागण्यामुळे बिग बॉस होस्ट महेश मांजरेकर कायम त्याला धारेवर धरतात. असे असतानाही त्याने मांजरेकरांसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.

(kiran mane shared post for mahesh manjrekar Bigg Boss Marathi 4)

बाहेरच्या जगाप्रमाणेच किरण माने यांच्या घरातही सर्वांशी खटके उडत आहेत. सुरवातीला मेघाघाडगे, मग प्रसाद मग अपूर्वा आणि अमृता देशमुख त्यांच्या रडारवर आहे. शिवाय विकास आणि त्यांची जवळीक हा एक वेगळाच चर्चेचा मुद्दा आहे. त्यावरूनही मांजरेकरांनी किरणला अनेकदा सुनावले आहे. पण आज मात्र किरणने आपल्या सोशल मीडियाच्या पोस्ट वरुण महेश सरांचं तोंड भरून कौतुक केलं आहे.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर किरण माने घरात (bigg boss marathi) कैद आहे तर ही पोस्ट कुणी लिहिली. तर किरण याच्या अपरोक्ष एक टीम तयार करण्यात आली आहे, जी घराबाहेर राहून त्यांचे सोशल मीडिया अकाऊंट हँडल करेल. याच टीमकडून एक खास फोटो आणि पोस्ट शेयर करण्यात आली आहे. नुकतेच मांजरेकर सर्व स्पर्धकांसाठी घराचं जेवण घेऊन बिग बॉस च्या घरात गेले होते. त्याबद्दलच किरणने त्यांचे आभार मानले आहेत.

''खवव्ये बरीच जण असत्यात... पन महेश मांजरेकर म्हणजी प्रेमानं खाऊ घालणारा आपला माणूस... एवढ्या वर्षात जवा जवा महेश सरांचा सहवास लाभला... तवा तवा त्यांनी आणलेल्या जेवणात अस्सल प्रेमाची चव घावली... काल पुन्हा एकदा हे प्रेम आमच्या वाट्याला आलं आणि हे प्रेम ते स्वतःहून आमच्याचसाठी घेवून आले... दोन प्रेमाच्या गोष्टी बोलून, आमाच्यासंग दोन घास जेवले... यात मन आन पोट दोन्हींबी भरलं... महेश सर तुमचे खूप खूप आभार..!'' अशी पोस्ट किरण माने याने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT