kiran mane special post for shah rukh khan with mohanlal video viral  SAKAL
मनोरंजन

Shah Rukh Khan: शाहरुख 'नमस्ते' नाही तर 'सलाम' करतो, किरण मानेंनी व्हिडीओ शेअर करत लिहीली पोस्ट

किरण मानेंनी एक व्हिडीओ शेअर करत शाहरुख खान बद्दल पोस्ट लिहीली आहे

Devendra Jadhav

शाहरुख खानने आजवर विविध सिनेमांमधून मनोरंजन विश्वात स्वतःचं असं अढळ स्थान निर्माण केलंय. शाहरुख खानचा बॉक्स ऑफीसवर जवान सिनेमा चांगलाच गाजला. जवानने ५०० कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवलाय.

मराठी मनोरंजन विश्वातील किरण माने हे शाहरुखचे जबरा फॅन. शाहरुख खान बद्दल किरण माने विविध पोस्ट शेअर करत असतात. अशातच शाहरुखचा एक व्हिडीओ शेअर करत किरण मानेंनी एक पोस्ट लिहीली आहे.

(kiran mane special post for shah rukh khan with mohanlal video viral)

किरण माने शाहरुखचा व्हिडीओ शेअर करुन लिहीतात

किरण मानेंनी शाहरुख खानचा एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत शाहरुख सोबत साऊथ स्टार मोहनलाल आणि इतर अभिनेते दिसत आहेत. शाहरुख जेव्हा स्टेजवर येतो तेव्हा तो सर्वांना सलाम करतो. आणि पुढे तो मोहनलालला झुकून नमस्कार करतो. मोहनलाल सुद्धा शाहरुखच्या या कृतीने भारावून जात त्याला मिठी मारते.

किरण मानेंनी शेअर केलेला शाहरुखचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय.

शाहरुखचा हा व्हिडीओ शेअर करुन किरण माने लिहीतात

हा व्हिडीओ शेअर करत किरण माने लिहीतात, "न झुकता पाठीचा कणा कुठं ताठ ठेवायचा आणि कुठं नम्रपणे झुकायचं, हे ज्याला कळलं... त्यानं जग जिंकलं !
परवा एका सी ग्रेड सिनेमा दिग्दर्शकाचा इंटरव्ह्यू पाहिला, ज्यात तो सांगत होता शाहरूख कधी कुणाला नमस्कार करत नाही, 'सलाम' करतो... आणि हा प्रसंग डोळ्यापुढे आला. आजकाल असत्य पेरून नफरत पसरवणारे सुमार दर्जाचे कलावंत मराठीतही आहेत आणि हिंदीतही. अशांनी गढुळ केलेल्या कलाक्षेत्रात शाहरूखसारखे लोक 'प्युरीफायर' आहेत. लब्यू SRK."

शाहरुखच्या जवानची रेकॉर्डब्रेक कमाई

शाहरुखचा जवान ७ सप्टेंबरला रिलीज झाला. शाहरुखच्या जवानने बॉक्स ऑफीसवर रेकॉर्डब्रेक कमाई केलीय. बॉक्स ऑफीस रिपोर्टनुसार जवानने आतापर्यंत ९०० कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवलाय.

जवान लवकरच १००० कोटी क्लबमध्ये दाखल होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरात जवानला चाहत्यांची पसंती मिळतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT