kiran mane special post on sonali kulkarni viral on social media  Esakal
मनोरंजन

Kiran Mane: तिची 'हीच' गोष्ट इतर मराठी अभिनेत्रींपेक्षा... किरण माने सोनाली कुलकर्णीसाठी असं काय म्हणाले?

किरण माने यांनी सोनाली कुलकर्णीविषयी एक खास पोस्ट लिहून मोठा खुलासा केलाय

Devendra Jadhav

Kiran Mane - Sonali Kulkarni:

नुकत्याच झालेल्या संविधान दिनी जागर लोकशक्तीचा हा कार्यक्रम मुंबईत पार पडला. या कार्यक्रमात किरण माने आणि सोनाली कुलकर्णी यांची भेट झाली. त्यानिमित्ताने किरण यांनी सोनालीसोबतचा फोटो शेअर करत लिहीलं की, "'संविधान प्रेमी कलाकार' कार्यक्रमात माझ्यासोबत सोनाली कुलकर्णी होती. लै लै लै भारी वाटलं तिला भेटून. तिच्या पहिल्या एकांकिकेपास्नं मी तिचा प्रवास बघितलाय. पुण्यातल्या तिच्या 'समन्वय' या ग्रुपमध्ये कामबी केलंय. आमच्या प्रत्यक्ष भेटी लै कमी झाल्यात, पण आज इतकी मोठी होऊनही ती पुर्वीइतकीच आपुलकीनं बोलते. माझ्या पोस्टस् ती आवर्जुन वाचत असते. आजबी भेटल्या-भेटल्या कौतुक करत म्हणाली, "किरण, तू ठाम भुमिका घेतोस याचं कारण म्हणजे तुझं वाचन आणि अभ्यास."

(kiran mane special post on sonali kulkarni)

किरण माने पुढे लिहीतात, "आम्ही समविचारी आहोतच पण आम्हाला जोडणारा दूसरा धागा म्हणजे दूबेजी ! माझ्या 'परफेक्ट मिसमॅच' या नाटकासाठी मी तिला विचारलं होतं. नाटक तिला लै आवडलं होतं.. पण त्यावेळी तिचं 'व्हाईट लिली नाईट रायडर' हे हिंदी नाटक सुरू होतं. त्यामुळे ते राहुन गेलं. पण त्यावेळी तिनं माझ्या डोक्यात एक किडा सोडून दिला होता, "किरण, परफेक्ट मिसमॅच वर सिनेमा खूप छान होईल. मला त्यात काम करायला आवडेल. एवढंच नाही तर मला त्या फिल्मच्या अख्ख्या प्रोसेसमध्ये रहायला आवडेल. त्याच्या साऊंड डिझाईनवर खूप क्रिएटिव्ह काम करता येऊ शकतं. बघ, विचार कर."...नंतर मी अमृता सुभाषबरोबर ते नाटक केलं, पण सोनालीनं सोडलेला तो किडा मला शांत बसू देत नव्हता."

किरण माने सांगतात, "मी आत्ता त्या नाटकावर सिनेमा लिहीतोय. जाणीवपूर्वक साऊंड डिझाईनवर स्पेशल सुचना लिहीताना कायम लैच कृतज्ञतापूर्वक तिची आठवण येते. तिनं त्यावेळी हे सुचवलं नसतं तर कदाचित त्या अतिशय महत्त्वाच्या भागाकडं माझं दुर्लक्ष झालं असतं."

किरण माने शेवटी लिहीतात, "सोनालीनं बाॅलीवूडमध्ये लै नांव कमावलं. आंतरराष्ट्रीय सिनेमांमधनंबी कामं केली. तरीही आमच्या 'अंधश्रद्धा निर्मुलन समिती'शी असलेलं जुनं नातं टिकवून तिनं समाजभान जपलंय. आजही ती अत्यंत बिझी असूनही संभाजी भगत यांच्या विनंतीचा मान राखून संविधान प्रेमी कलावंतांच्या मेळाव्याला आली. सोनालीची हीच गोष्ट तिला इतर मराठी अभिनेत्रींपेक्षा एक पायरी वर नेते. सोनाली, तू अशीच गोड आणि डाऊन टू अर्थ रहा. लब्यू."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

SCROLL FOR NEXT