kiran mane talk about jawan actor who played role of farmer onkar das manipuri SAKAL
मनोरंजन

Jawan: नाटकातला 'नाच्या' ते अभिनेता.. जवानमध्ये असलेला शेतकरी कोण? किरण माने सांगतात...

जवानमध्ये जो शेतकरी आत्महत्या करतो तो नक्की कोण आहे? किरण माने लिहीतात...

Devendra Jadhav

शाहरुखचा जवान सध्या सगळीकडे गाजतोय. जवानने आजवर बॉक्स ऑफीसवर तुफान कामगिरी केलीय.जवानने जगभरातुन ६०० कोटींपेक्षा जास्त कमाई केलीय. तर भारतात जवानने ४०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री घेतली.

शाहरुखच्या जवानमध्ये प्रत्येक कलाकाराची भुमिका लक्षात राहीली. जवानमध्ये आत्महत्या केलेल्या अभिनेत्याची भुमिका सुद्धा लक्षात राहते. हा अभिनेता कोण? त्याचा बॉलिवूडमध्ये प्रवेश कसा झाला? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं किरण मानेंनी दिली आहेत.

किरण माने लिहीतात, 'जवान' मध्ये एका दलित शेतकर्‍याला छितपुट कर्जाच्या वसुलीसाठी त्याच्या बायको,मुलीसमोर आणि गांवासमोर नग्न करून मारहाण केली जाते. ट्रॅक्टर ओढून नेला जातो. तरीही तो रडणार्‍या बायकोवर खेकसतो, "तोंड बंद ठेव. पोरीची परीक्षा आहे ना?"... रडणार्‍या मुलीला शांत करत, "काही विशेष नाही गं त्यात. माझीच चूक होती. तू जा. पेपर दे नीट." असं म्हणत मुलीला परीक्षा देण्यासाठी पाठवतो... ...आणि स्वत:ला गळफास लावून घेतो.

किरण माने पुढे त्या अभिनेत्याबद्दल सांगतात, ओंकारदास माणिकपुरी असं या अभिनेत्याचं नांव. छत्तीसगढमधल्या एका छोट्या खेड्यातल्या गरीब शेतकर्‍याचा पोरगा. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यानं गांवाकडच्या 'नाटक मंडली'त काम करायला सुरूवात केली. 'नाच्या' म्हणून. उघड्या मैदानात होणार्‍या नाटकाला प्रेक्षक जमवण्यासाठी गाणी म्हणायची, जोक सांगायचे, मिमिक्री करायची, हे त्याचं काम. एक दिवस तो प्रख्यात नाट्य दिग्दर्शक हबीब तन्वीर यांच्या नजरेस पडला. तिथून पुढं त्यानं मागं वळून नाय पाहिलं भावांनो. उत्तरेकडच्या अभिजात नाटकांमध्ये त्याचं नांव आज लै मानानं घेतलं जातं. यापूर्वी तो आमीर खानच्या 'पीपली लाईव्ह' सिनेमातबी आपल्याला दिसला होता.

किरण माने शेवटी लिहीतात, "आपल्याकडे गांवखेड्यांत तमाशातली वगनाट्यं, लोकनाट्यं, कलापथकं यात काम करणारे असे लै लै लै भन्नाट अभिनेते आहेत. ज्यांना योग्य दिग्दर्शकानं मार्गदर्शन केलं, एक संधी मिळाली तर ते त्याचं सोनं करतील. इरफान खान, नवाज, संजय मिश्रा, पंकज त्रिपाठी या उत्तरेकडच्या गांवातल्या पोरांनी जत्रेतल्या नाटकांपास्नं सुरूवात करून हे सिद्ध केलंय.

ग्रामीण मातीतनं वर आलेल्या ओंकारदासला यापुढेही अशा अनेक संधी मिळोत. थिएटरचा पाया असलेले, अभिनयाला अतिशय गांभीर्यानं घेणारे असे पॅशनेट नट भारतीय सिनेमा समृद्ध करणार आहेत... गांवखेड्यातल्या प्रतिभावानांना प्रेरणा देणार आहेत. सलाम ओंकारदास...कडकडीत सलाम !"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : नागपूरसाठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली काळी पिवळी मारबत मिरवणूक आज निघणार

PMC News : महापालिकेची मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी कडक पावले; १७ हजार कोटी रुपये अद्याप येणे, महापालिकेकडून विविध उपाययोजनांवर भर

SCROLL FOR NEXT