kiran mane write emotional post on social media related to his serial sindhutai maazi maai colors marathi SAKAL
मनोरंजन

Sindhutai Mazi Maai: "रोज माझे डोळे पाणावतात", किरण मानेंनी शेअर केला सिंधुताई माझी माई सेटवरचा हळवा अनुभव

सिंधुताई माझी माई मालिकेत किरण माने सिंधुचे वडील अभिमान साठेंची भुमिका साकारत आहेत

Devendra Jadhav

सध्या कलर्स मराठीवरील सिंधुताई माझी माई मालिका चांगलीच चर्चेत आहे. काहीच दिवसांपुर्वी ही मालिका सुरु झालीय. या मालिकेत किरण माने सिंधुचे वडील अभिमान साठेंची भुमिका साकारत आहेत.

या मालिकेच्या निमित्ताने एका बापाच्या आत असलेल्या हळव्या मनाला मालिकेत साद घातली आहे. ही भुमिका साकारतानाचा विलक्षण अनुभव किरण मानेंनी शेअर केला.

(kiran mane write emotional post on social media related to his serial sindhutai maazi maai colors marathi)

किरण माने लिहीतात, "पं सत्यदेव दूबेजी एकदा म्हणाले होते, "अभिनयातला एक भाव असा आहे, जो पुरूष कलावंतांना व्यक्त करणं फार अवघड असतं... स्त्री कलावंतांसाठी ते अगदीच सोपं असतं... तो म्हणजे 'वात्सल्य' भाव ! पोटच्या लेकराविषयीचं ममत्व."ते बोलल्याक्षणी मी ते डायरीत लिहीलं होतं. हिंदी सिनेमात पुरूष कलावंतांनी उत्कटपणे आणि उत्कृष्टपणे दाखवलेल्या वात्सल्यभावाची दोन उदाहरणंही दूबेजींनी दिली होती. एक 'नाजायज़' सिनेमातल्या "अभि जिंदा हूॅं तो जिने लेने दो" या गाण्यातलं... नसिरूद्दीन शाह आपल्या मुलाला, अजय देवगणला पहाण्यासाठी रस्त्यावरच्या भिकार्‍यांसोबत गाणे गात-गात त्याच्या घरासमोर जातो... आणि डोक्यावर घोंगडे पांघरुन त्याला लपून पहातो तो क्षण..."

किरण माने पुढे लिहीतात.. "आणि दुसरा प्रसंग 'पापा कहते है' सिनेमात टिकू तलसानियानं मुलीच्या बिदाईच्या वेळी साकारलेला !असा पुरूष कलावंतांना दुर्लभ असलेला 'वात्सल्यभाव' भरभरून दाखवायची संधी मला 'सिंधुताई... माझी माई' मालिकेनं दिलीय.अभिमान साठे हा जगावेगळ्या पोरीचा जगावेगळा बाप साकारताना रोज मन भरून येतं... रोज डोळे पाणावतात... मुलीतलं टॅलेन्ट ओळखून तिला शिकायला मिळावं, तिनं मोठं व्हावं म्हणून, सगळ्या संकटांशी विलक्षण ताकदीनं लढलाय हा माणूस ! जन्मापासून स्वत:च्या आईसकट संपूर्ण घरानं नाकारलेल्या चिंधीवर मायेचा अमाप वर्षाव करणारा 'बाप'माणूस तिला लाभला म्हणून तर नंतरच्या काळात ती हजारो अनाथांची माय होऊच शकली...."

किरण माने शेवटी सांगतात.. "रंगभुमी आणि टी.व्ही.नं मला कायम अविस्मरणीय भुमिका दिल्या. टीव्हीनं तर घराघरात पोहोचवलं. लोकप्रियता दिली. ते दान घेताना कुठेही कमी पडू नये याची काळजी मी मनापासून घेतोय... तुम्ही, माझ्या चाहत्यांनीही माझ्या सगळ्या कलाकृतींना कायम उच्चांकी टीआरपी दिलाय. ही तर प्रेमाचा, मायेचा, वात्सल्याचा संदेश घेऊन आलेली मालिका आहे. हिच्यावर तुम्ही मनापासून प्रेम कराल याची खात्री आहे.न हारा है 'इश्क़' और न दुनिया थकी है...दिया जल रहा है, हवा चल रही है !-"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kabaddi Player Murder : कब्बडीपटूची भरदिवसा हत्या! पोलिसांकडून आरोपीचं एन्काउंटर अन् एकास अटकही

Farmer Suicide : नापिकी अन् कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यानं विहिरीत उडी मारून संपवलं जीवन

Ravi Kishan Death Threat : ‘’चार दिवसांत बिहारला आलात की …’’ म्हणत, रवी किशन यांना जीवे मारण्याची धमकी!

Pro Kabaddi Final 2025: दबंग दिल्लीने मारली बाजी! पुणेरी पलटनला अटीतटीच्या लढतीत केले पराभूत, २ गुणांनी रोमहर्षक विजय

Shirur Accident : आरामबसची पुढे चाललेल्या मोटारीला धडक; दोन्ही बससह मोटारीतील १६ प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT