Kiran Mane  Esakal
मनोरंजन

'शेतकरी माझ्या काळजाच्या जवळचा विषय'..., किरण मानेंची शेतकरी बांधवासाठी खास पोस्ट..

Vaishali Patil

मराठी बिग बॉसच्या चौथ्या पर्वा संपल्यानंतरही या पर्वातील सर्व सदस्यांची चर्चा रंगत असते. याच बिग बॉसच्या चौथ्या पर्वात किरण माने देखील सहभागी झाले होते. साताऱ्याचा बच्चन म्हणुन किरण मानेंनी या शो मध्ये कमालच केली.

अनेक वर्षे मालिका, चित्रपट, नाटक करून त्यांनी नाव लौकिक मिळवला आहे. मात्र बिग बॉस मराठी नंतर त्याच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली. मुंबईत सह ग्रामीण भागात त्यांची प्रचंड हवा आहे. ते सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सातत्याने ते काहीना काही पोस्ट करत असतात.

आता त्याच्या हातात अनेक नवीन प्रोजेक्ट आहेत. ते सध्या त्याच प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहेत. किरण माने हे आगामी 'रावरंभा' चित्रपटात दिसणार आहेत. दरम्यान ते एका जाहिरातीतही दिसणार आहे. मात्र ही जाहिरात करण्याच कारण जरा वेगळ आहे आणि ती करतांना किरण माने यांना खुप आनंदही झाल्यांच दिसत आहे.

त्यांनी सोशल मिडियावर त्याच्या शैलित एक पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली. त्यांची ही जाहिरात शेती संबधित एका प्रोडक्टची आहे. शेती आणि किरण माने हे नातं खुप खट्ट आहे, त्यामुळे ही जाहिरात करायला मिळाली यामुळे ते खुप आनंदित असल्याच या पोस्ट वरुन दिसतय.

या पोस्टमध्ये माने म्हणताय की, '..लै दिसांनी जाहिरातीत काम करतोय. ते बी शेतकर्‍यांशी संबंधित प्राॅडक्टच्या ! शेतकरी हा माझ्या काळजाच्या लै जवळचा विषय. माझे सगळे पावने रावळे शेतकरी... आमच्या गोतावळ्यात शेती आन् जनावरांचा विषय निघाला की हल्ली मिल्सन पशुखाद्याचं नांव सारखं निघायचं. त्याची 'ॲड' आपल्याला कधी करायला मिळंल असं वाटलं नव्हतं. एकंदरीत लै मनासारख्या गोष्टी घडायला सुरूवात झालीय. तुमचं प्रेम असंच राहुद्यात. लै रान हानायचंय अजून. '

त्याच्या या पोस्टला नेटकऱ्यांनीही खुप प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकीने लिहिलयं की, 'आमच्यासाठी तर ही मेजवानीच की , मग ती भुमिका कुठलीही असो', तर अनेकांनी त्यांच अभिनंदन केले आहे. या पोस्टमध्ये स्वत:ला शेतकरी पुत्र असं म्हणवुन घेतल आहे. माणुस कितीही मोठा झाला तरी त्यांची नाळ मात्र मातीशी जुळलेली असते हे त्याच्या पोस्टमधुन कळतयं.

कधी वादग्रस्त विषय, कधी मालिकेतील गोंधळ तर कधी आणखी काही अशा अनेक कारणाने किरण माने हे चर्चेत राहिलेले आहे. मात्र बिग बॉसच्या पर्वानंतर त्यांची प्रतिमा ही पुर्णपणे वेगळी दिसतेय. त्यांना चाहत्यांच प्रेम मिळत आहे. नेटकरी त्यांच्या पोस्ट आणि प्रोजेक्ट बद्दल उत्सूक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak: परीक्षा झाली, मुलाखतीही झाल्या; मग MPSC ने संपूर्ण भरतीच का रद्द केली? पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

Kolhapur Gender Determination Case: गर्भलिंग निदानप्रकरणी ‘एस.पी. टोळी’ला मोका; राज्यातील पहिलीच कारवाई; ११ जणांवर बडगा

BABAR AZAM: पहिल्या टेस्टमधून बाहेर, पण आता कमबॅकसाठी सज्ज? बाबर आझमच्या फिटनेसवर पाकिस्तान टीम मॅनेजमेंटने दिली मोठी अपडेट

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा जोर धरणार, हवामान विभागाचा अंदाज

Congress on Caste Census: जातगणना प्रक्रियेला काँग्रेसचा तीव्र विरोध ;खर्गे, राहुल यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

SCROLL FOR NEXT