Kiran Rao Latest News esakal
मनोरंजन

Kiran Rao: 'मला त्याची 'एक्स वाईफ' का म्हणता', किरण राव एवढी का संतापली?

दरवेळी लोकं मला आमिरच्या नावावरुन का ओळखतात असा सवालही किरणनं (Kiran Rao News) विचारला आहे.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Kiran Rao Latest News: बॉलीवूडची प्रसिद्ध निर्माती आणि दिग्दर्शिका म्हणून किरण रावची (Laapataa Ladies director Kiran Rao) वेगळी ओळख आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्या त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांमुळे चर्चेत आल्याचे दिसून आले आहे. किरण राव यांचा लापता लेडीज नावाचा चित्रपट येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सध्या त्या त्यांच्या लापता लेडीज (Laapataa Ladies Movie) नावाच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. अशातच त्यांनी संदीप रेड्डी वांगाच्या अॅनिमल या चित्रपटावरुन एक वक्तव्य केले होते.त्यावरुन त्या ट्रोल झाल्या होत्या. ते वक्तव्य जेव्हा रेड्डी पर्यत गेले तेव्हा त्यानं आमिरच्या काही चित्रपटांचा दाखला दिला होता. यावरुन किरण राव आणि रेड्डी वांगा यांच्यात वाद झाल्याचे दिसून आले.

काही वर्षांपूर्वी आमिर खान आणि किरण राव यांच्यात घटस्फोट झाला. त्यानंतरही किरण राव यांना आमिर खानची पत्नी म्हणूनच ओळखले जात होते. यावरुन त्यांनी नेटकऱ्यांना खडसावले आहे. तुम्हाला फक्त मी आमिर खानची एक्स वाईफ म्हणूनच माहिती आहे का, माझी वेगळी काही ओळख नाही का, असा प्रश्न किरणनं यावेळी तिला ट्रोल करणाऱ्यांना विचारला आहे. किरणनं तिच्या वैयक्तिक आयुष्यावरुन तिला वेगवेगळे प्रश्न विचारणाऱ्यांना देखील खडसावले आहे.

२००५ मध्ये आमिर खान आणि किरण रावचं लग्न झालं होतं. त्यांनी १६ वर्षानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मात्र लग्नानंतरही त्यांच्यातील मैत्री कायम असल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी आमिरच्या लेकीच्या लग्नात किरण राव यांची हजेरी आणि त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग दिसून आला होता.त्यातील व्हायरल फोटो आणि व्हिडिओला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

माझी वेगळी ओळख आहे..

लापता लेडीजच्या दिग्दर्शिका म्हणून सध्या किरण रावच्या नावाची वेगळी चर्चा सुरु आहे.जगभरातील अनेक महोत्सवांमध्ये हा चित्रपट दाखवण्यात आला असून त्याला चाहत्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. सध्या त्यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले की, मला आमिरची एक्स वाईफ म्हणून ओळखले जाते ते चूकीचे आहे.माझी वेगळी ओळख आहे की नाही हा प्रश्न मला नेटकऱ्यांना विचारावासा वाटतो.

मला नेटकऱ्यांचे विशेष वाटते. ते मला अस का बोलत असतील. मी कोण आहे काय करते हे त्यांना माहिती नसावे. म्हणून ते असे बोलत असतील का असा प्रश्न किरण राव यांनी विचारला आहे. भलेही आमिर आणि मी विभक्त झालो असू पण आमच्यातील मैत्री कायम आहे. तो कधीही माझ्या प्रोजेक्टमध्ये लुडबूड करत नाही असेही किरण रावनं म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMCच्या ३१ हजार कोटींच्या ठेवी मोडणार, विकासकामांसाठी वापरणार; भाजपचा महापौर होताच मोठा निर्णय

T20 WC, IND vs ZIM: भारतीय संघाने Playing XI मध्ये काय करावा बदल? पाँटिंग, शास्त्रींनी 'त्या' एका खेळाडूचं नाव घेत स्पष्ट सांगितलं

Latest Marathi News Live Update : पुण्याच्या येरवडा कारागृहात कैद्यांकडे मोबाईल सापडल्याने खळबळ, सिमकार्ड, पॉवर बँक, चार्जर आणि वायर जप्त

Congress vs BJP Political Clash : 'दिवा विझण्याआधी फडफडतो तशी भाजपची सध्याची अवस्था, शेवट जवळ आलाय'; डीके शिवकुमारांची जहरी टीका

Insurance: अपघात झाला तरी खिशाला फटका नाही! Zero Dep Insurance मुळे कसे वाचतील पैसे?

SCROLL FOR NEXT