Kiran Rao Viral Interview news esakal
मनोरंजन

Kiran Rao Viral Interview : 'घटस्फोटानंतरही वापरते आमिरचं नावं, त्यात कसली आली लाज'! किरणनं स्पष्टच सांगितलं

लापता लेडिजच्या दिग्दर्शक किरण रावनं (Kiran Rao Viral Interview) त्या मुलाखतीत जी गोष्ट सांगितली, त्याची चर्चा होताना दिसतेय.

युगंधर ताजणे

Laapataa Ladies Kiran Rao News : प्रसिद्ध दिग्दर्शिका किरण रावच्या लापता लेडिजची चर्चा होताना दिसत ( Laapataa Ladies)आहे. त्याची निर्मिती प्रसिद्ध अभिनेता आमिर खाननं केली आहे. अशातच किरण रावनं एका मुलाखतीमध्ये केलेल्या वक्तव्यानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

लापता लेडिजचे दिग्दर्शन किरणनं केले असून त्याला नेटकऱ्यांचा, ( Laapataa Ladies latest news) प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. त्या चित्रपटाची निर्मिती किरण रावनं केली आहे. यावेळी किरणनं काही मुलाखतींमधून आपली मतं तितक्याच परखडपणे मांडली आहेत. (aamir khan production) तिला तू तुझ्या या चित्रपटाच्या माध्यमातून आमिर खानच्या नावाचा वापर करते आहेस असे वाटत नाही, असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता.

मला हे मान्य आहे की मी आमिरच्या नावाचा वापर माझ्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केला आहे. असे बिनधास्तपणे किरणनं सांगितले आहे. यापूर्वी (aamir khan latest news) तिच्यावर वेगवेगळ्या प्रकारे टीका होत होती. त्याला तिनं उत्तर दिलं आहे.

किरणनं ती गोष्ट कबूल केली...

किरणनं हसून सांगितलं की, हो मला माहिती आहे की, माझा त्याच्यासोबत घटस्फोट झाला आहे. पण मी त्याच्या नावाचा फायदा घेते. (kiran rao interview) त्यात कसली आली लाज. मी त्याच्या नावानं माझ्या चित्रपटाचे प्रमोशन तर करते आहे ना, आणि आमिर खानच्या नावाचे वजन आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अशावेळी मला त्याचा थोडा फायदा होत असेल तर त्याला काय हरकत आहे, अशी मिश्किल टिप्पणी किरणनं यावेळी केली.

यावरुन तिनं एक उदाहरण सांगितलं आहे. ती म्हणते समजा माझ्याकडे एक फिल्म आहे. आणि ती त्याच्या मदतीनं मी पूर्ण केली आहे. तर त्याच्या प्रमोशनसाठी मी त्याचे साह्य घेतेच की.. त्यात मला कोणतीही लाज वाटत नाही. तो एक प्रमोशनचा भाग आहे. अशा शब्दांत किरणनं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

किरण आणि आमिरचे चित्रपट...

लापता लेडिजमधून किरण आणि आमिरनं पुन्हा एकदा एकत्रित काम केले आहे. यापूर्वी त्यानं किरणच्या धोबी घाट, पीपली लाईव्ह आणि सिक्रेट सुपर स्टार नावाच्या चित्रपटामध्ये काम केले होते. त्या चित्रपटांना प्रेक्षकांचा, नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता लापता लेडिजच्या निमित्तानं ते दोघेही एकत्र आले आहेत.

सोशल मीडियावर किरण आणि आमिरच्या केमिस्ट्रीची चर्चा रंगलेली दिसतेय. एका जाहीर कार्यक्रमातून आमिरनं आपण किरणला पुन्हा मला एक संधी मिळू शकते का अशी विचारणा केली होती, माझ्याकडून काय चूक झाली होती असे म्हणून तिचं मनं वळवण्याचा प्रयत्न केला होता. या दोन्ही सेलिब्रेटींचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Education : विधान परिषदेत शिपायाच्या कंत्राटी पदावरून पेच; सत्ताधारी शिक्षक, पदवीधर आमदारांनीच केला सभात्याग

Ashadhi Ekadashi 2025: मुखात तुझे नाव, डोळ्यात तुझे गाव;डिगडोहमध्ये ‘विठ्ठल रखुमाईचा दर्शन सोहळा, माऊली ग्रुपचा उपक्रम

Ahilyanagar: 'श्रीरामपूरकरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्वागत'; ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष

Pune Crime : सोसायट्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर, कोंढव्यातील घटनेनंतर भीती; सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा यंत्रणेवरही प्रश्‍नचिन्ह

Ashadhi Wari 2025:'वरुणराजाच्या साक्षीने संत भेटीचा सोहळा'; बोंडले येथे संत तुकाराम महाराज व संत सोपानदेव महाराज यांची भेट

SCROLL FOR NEXT