Kirron Kher,Sikandar Kher  Instagram
मनोरंजन

'आता तरी लग्न कर'; कॅन्सरग्रस्त किरण खेर यांचा व्हिडिओ व्हायरल

किरण यांचे पती अनुपम खेर त्यांच्या प्रकृतीची माहिती सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असतात.

प्रियांका कुलकर्णी

मुंबई - भारतीय जनता पार्टीच्या चंदीगडच्या खासदार आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री किरण खेर Kirron Kher मल्टीपल माइलोमा multiple myeloma या आजारानं त्रस्त आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. किरण यांचे पती अनुपम खेर anupam kher त्यांच्या प्रकृतीची माहिती सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असतात. किरण यांचा मुलगा सिकंदरने Sikandar Kher नुकत्याच एका लाइव्हमध्ये किरण यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली.(Kirron Kher battling cancer makes appearance in son Sikandar Kher video)

सिकंदरच्या या लाइव्हमध्ये किरण यांनी देखील चाहत्यांसोबत संवाद साधला. या लाइव्हचा व्हिडीओ शेअर करून सिकंदरने त्याला कॅप्शन दिले,'खेर साहेब आणि किरण मॅडम.आमचे हे छोटेसे कुटुंब आहे. माझ्या कुटुंबाकडून आणि माझ्याकडून नमस्कार. तुम्ही सर्वांनी आईवर केलेल्या प्रेमाबद्दल मी तुमचे आभार मानतो.' या व्हिडिओमध्ये सिकंदर म्हणाला,' मी माझ्या आई वडिलांसोबत आहे. तुम्हाला किरण खेर यांना पहायचे आहे का?' त्यानंतर सिकंदरने किरण यांना लाइव्हमध्ये घेतले. किरण यांनी सर्व चाहत्यांना नमस्कार केला. त्यानंतर त्या सिकंदरला म्हणाल्या, 'काही महिन्यानंतर तु 41 वर्षाचा होणार आहेस त्यामुळे आता तु लग्न केले पाहिजे.' या व्हिडिओमध्ये अनुपम खेर देखील दिसत आहेत.

मल्टीपल माइलोमा हा ब्लड कॅन्सरचा प्रकार आहे. 1 एप्रिल रोजी किरण यांनी मीडियाला या आजाराबद्दल सांगितले. तसेच 11 नोव्हेंबर 2019 मध्ये किरण यांच्या चंडीगढमधील घरामध्ये पडल्यामुळे त्यांचा डाव्या हाताला दुखापत झाली होती. हाताच्या उपचारादरम्यान त्यांना मल्टीपल मायलोमा या कॅन्सरचं निदान झालं. किरण यांच्यावर कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. काही दिवसांपुर्वी कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर बोन सर्जरी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर,काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT