kirti college wins INT one act competition first prize to ukali ekankika sakal
मनोरंजन

दोन वर्षांनी झाला जल्लोष! 'आयएनटी' एकांकिका स्पर्धेत किर्ती महाविद्यालयाची बाजी

'आयएनटी' ही मुंबईतील आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमधली अत्यंत मानाची स्पर्धा मानली जाते.

सकाळ डिजिटल टीम

INT ekankika spardha : जून महिन्यात कॉलेज सुरू झाल्यानंतर नाट्यवेड्या विद्यार्थ्यांना वेध लागतात ते 'आयएनटी' (INT) या मानाच्या एकांकिका स्पर्धेचे. वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष ही एकांकिका स्पर्धा झाली नाही. पण यंदा मात्रा ही स्पर्धा अत्यंत जल्लोषात पार पडली. मंगळवार, २० सप्टेंबर रोजी या स्पर्धेचा अंतिम सोहळा पार पडला. यामध्ये मुंबईतील किर्ती महाविद्यालयाने 'आयएनटी'च्या सर्वोत्कृष्ट एकांकिकेच्या पारितोषिकावर मोहर उमटवली.

(kirti college wins INT one act competition first prize to ukali ekankika)

यंदाच्या स्पर्धेत मुंबईतील १८ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. प्राथमिक फेरीतून पुढे अंतिम फेरीसाठी केवळ पाच महाविद्यालये निवडली गेली. या मध्ये किर्ती, रुईया,महर्षी दयानंद, खालसा आणि साठ्ये अशा पाच महाविद्यालयाच्या एकांकिका होत्या. स्पर्धेचा अंतिम सोहळा नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये पार पडला. सर्वच स्पर्धक संघांनी अत्यंत दमदार सादरीकरण केले. उपस्थित विद्यार्थी वर्गातही प्रचंड जल्लोषाचे वातावरण होते.

अंतिम फेरीत दादरच्या किर्ती महाविद्यालयाच्या 'उकळी' या एकांकिकेने सर्वोत्कृष्ट एकांकिकेचे प्रथम पारितोषिक पटकावले. परळच्या एम. डी. (महर्षी दयानंद) कॉलेजच्या 'बारम' एकांकिकेला द्वितीय पारितोषिक मिळाले. तर तृतीय क्रमांक खालसा महाविद्यालयाच्या 'काहीतरी अडकलंय' या एकांकिकेने पटकावला.

'आयएनटी' या स्पर्धेच्या परीक्षणाची धुरा नाटककार विजय केंकरे, अभिनेत्री आणि लेखिका मुग्धा गोडबोले, लेखक राजीव जोशी यांनी सांभाळली. विजेत्या संघाला खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. यावेळी टाळ्यांचा कडकडाट, शिट्ट्या, महाविद्यालयांच्या नावाचा जयघोष याने नाट्यगृह दुमदुमले होते. तब्बल दोन वर्षांनी हा माहोल अनुभवता आल्याने परीक्षक, प्रेक्षक आणि स्पर्धक यांच्यामध्ये कमालीचे आनंदाचे वातावरण होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' नशेत धुंद मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT