kishor kadam saumitra poem on CM Shinde Fadnavis Ajit Pawar Viral video clip Maratha reservation  
मनोरंजन

Kishor Kadam : ''होईल जनतेचं जे व्हायचं, आपल्याला काय.. आपण बोलून निघून जायचं...''; सौमित्रची कविता व्हायरल

रोहित कणसे

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलीसांकडून लाठीमार करण्यात आला आणि हे आंदोलन राज्यभरात पसरलं. या आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये आपण बोलून मोकळं व्हायचं असं म्हणताना ऐकू येतय. दरम्यान या मुद्द्यावर प्रसिद्ध अभिनेते किशोर कदम यांनी कवितेच्या माध्यमातून मार्मिक भाष्य केलं आहे.

अभिनेते किशोर कदम हे सौमित्र या टोपण नावाने कवीता लिहीतात. वेगवेगळ्या सामाजीक मुद्द्यावरूल त्यांच्या कवीता प्रसिद्ध आहेत, दरम्यान सोशल मीडियावर त्यांची "आपण बोलून निघून जायचं .." या शिर्षकाची कविता चर्चेचा विषय बनली आहे. सौमित्र यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर ही कवीता पोस्ट केली आहे...

आपण बोलून निघून जायचं ..

होईल जनतेचं जे व्हायचं

आपल्याला काय..

आपण बोलुन निघुन जायचं...

आपल्याला काय..

केवढी जनता असते समोर

आपल्या जीवाला नस्ता घोर

सगळेच पक्ष लावतात जोर

कोण साधून् कोण चोर

आपली तशीच विचारधारा

जिकडे जसा वाहिल वारा

घालत राहायच्या येरझारा

जातोच निसटुन हातुन पारा

हेच लक्षण लक्षात ठेऊन

आपण येत जात ऱ्हायचं

तहाने सारखं व्याकुळ व्हायचं

जकडे झरा तिथलं प्यायचं

आपल्याला काय...

आपण पिउन निघुन जायचं

आपल्याला काय...

लोकांची पण सहनशक्ती

आपण ताणुन बघत नुस्ती

लाऊन द्यायची त्यांच्यात कुस्ती

कैसा गांव कैसी बस्ती

आपलेच सगळे कार्यकर्ते

आपले कर्ते आपले धर्ते

जिधर घुमाव उधर फिरते

त्यांच्या हातात काय उरते

उद्या परवा विचार करू

नंतर त्यांना काय द्यायचं

आधी बघू काय खायचं

लोकशाहीचंच गाणं गायचं

आपल्याला काय..

आपण गाउन निघुन जायचं

आपल्याला काय..

चोविस तास बातम्या मिळोत

चॅनल्स जाहिराती गिळोत

न्याय अन्यायाशी पिळोत

एफबी इन्स्टा सारे फळोत

खड्डे सगळे तसेच सडोत

निकाल लांबणीवरती पडोत

नशिबाशी कामं अडोत

नको तशा घटना घडोत

जे जे हवं ते ते द्यायचं

तेवढ्या पुरतं त्राता व्हायचं

कशालाही नाही भ्यायचं

आपल्याला काय..

वचनं देउन निघुन जायचं

आपल्याला काय..

रोज लोकां समोर यायचं

रोज लोकां समोर जायचं

माईक बंद चालू असो

आपण फक्तं बोलत ऱ्हायचं

आपल्याला काय ..

सौमित्र.

नेमकं झालं काय होतं?

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेच्या सुरूवातीला तीनही नेते आले असताना माईक सुरु असल्याने परिषद सुरू होण्यापूर्वीचा त्यांचा आवाज रेकॉर्ड झाला.

या संवादामध्ये नेमकं काय आहे?

एकनाथ शिंदेः आपल्याला काय? बोलायचं अन् निघून जायचं, बोलून मोकळं व्हायचं.

अजित पवारः हो.. येस

देवेंद्र फडणवीसः माईक चालू आहे.

मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

हा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला आणि मराठा समाजामधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जाऊ लागल्या. यानंतर ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तो एडीट केलेला असल्याचं म्हटलं होतं. मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृहावर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती. या पत्रकार परिषदेपूर्वीचा माईकवरील संवाद ‘सोशल मीडिया’वर व्हायरल झाला आहे.

मात्र हा संवाद चुकीच्या पध्दतीने संपादित करुन फिरवण्यात आलेला असून हा खोडसाळपणा आहे, मराठा आरक्षणाबाबत सरकार सुरुवातीपासून संवेदनशील असून कायद्याच्या चौकटीत बसेल असे आरक्षण देण्याबाबत आम्ही काम करीत आहोत. तरीही मुद्दामहून काही विरोधक खोडसाळपणे आणि व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; पदाधिकाऱ्यांच्या पक्षत्यागावर संतोष केणेंचा माजी आमदारांवर थेट आरोप, म्हणाले...

Maharashtra Latest News Update: माटुंगा पोलिसांच्या थरारक कारवाईत दरोड्यातील मुख्य आरोपी अटक

SCROLL FOR NEXT