KK's daughter taamara asks people not to abuse or spread hate against kk's team  sakal
मनोरंजन

कृपया माझ्या बाबांच्या टीमविरोधात.. गायक 'केके'च्या मुलीने जोडले हात

गायक 'केके'च्या टीम विरोधी चुकीच्या कल्पना पसरवल्या जात असल्याने मुलगी तमाराने भावनिक संदेश दिला आहे.

नीलेश अडसूळ

KK Daughter Taamara : बॉलीवुड मधील प्रसिद्ध गायक केके यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांना आणि त्यांच्या अजरामर गीतांना विसरणे कठीण आहे. त्यांची मुलगी तमारा 'केके' यांच्या निधनानंतर सोशल मीडियावरुन चाहत्यांशी संवाद साधत आहे. फादर्स डे ला ही तिने काही जुने फोटो पोस्ट करत आपल्या वडिलांविषयी लिहिले होते. आता तिने एक भावनिक संदेश काही लोकांना दिला आहे. जे केके यांच्या टीमची बदनामी करत आहेत.

(KK's daughter Taamara post on her dad kk's team) (KK's daughter taamara asks people not to abuse or spread hate against kk's team)

कलकत्ता येथील एका कॉन्सर्टदरम्यान हृदय विकाराच्या झटक्याने केकेचं निधन झालं. केकेच्या निधनानंतर सोशल मीडियावरून त्याच्या टीमवर टीकेची झोड उठवण्यात आली. केकेच्या टीमने त्याच्या तब्येतीची योग्य काळजी न घेतल्यानं असं घडल्याचं म्हटलं गेलं होतं. जर केकेला वेळीच योग्य उपचार मिळाले असते तर कदाचित तो वाचला असता असं देखील बोललं गेलं. केकेची संपूर्ण टीम आणि त्याचे मॅनेजर हितेश भट आणि शुभम भट यांच्या विरोधात सोशल मीडियावर बऱ्याच पोस्ट देखील व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर आता केकेची मुलगी तामरानं याबाबत एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना भावनिक आवाहन केलं आहे.

तमारा म्हणते, 'या फोटोमधली प्रत्येक व्यक्ती माझ्या बाबांच्या कायम सोबत होती, त्यामुळे त्यांची मी आभारी आहे. माझ्या बाबांचे कार्यक्रम प्रत्येकाच्या आठवणीत राहतील असे होण्यासाठी या सर्वांनी भरपूर मेहनत घेतली आहे. मी हितेशला सांगितलं की, जेव्हा बाबा गेले तेव्हा मी, आई किंवा नकुल कोणीच त्यांच्यासोबत नव्हतो. त्यांना आणि अखेरचं गुड बाय देखील म्हणू शकलो नाही. पण आम्हाला आनंद आहे की तुम्ही नेहमीच त्यांच्या सोबत होता. जेव्हा बाबांनी काम करायला सुरुवात केली तेव्हापासून त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही त्यांना साथ दिली.'

पुढे ती म्हणते, 'बाबांचं त्यांच्या टीमधील प्रत्येकावर खूप प्रेम होतं. त्यांच्यावर त्यांचा खूप विश्वास होता. मी ऐकलंय की हितेश आणि शुभम यांच्यावर बरीच टीका करण्यात आली. त्यांना धमक्यांचे फोन आहे, इमेल्स आले. जर आज बाबा असते तर त्यांना कसं वाटलं असतं. तुम्ही चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवत आहात. कृपया त्यांच्या टीमच्या विरोधात अशाप्रकारे नकारात्मकता परसवू नका,' अशी कळकळीची विनंती 'केके'च्या मुलीने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT