KK's daughter Taamara pens heartbreaking Father's Day post, says 'life is dark without you dad' sakal
मनोरंजन

काल फादर्स डे होता, पण.. गायक केकेच्या आठवणीत मुलीची भावनिक पोस्ट

दिवंगत गायक केके यांची मुलगी तमारानं फादर्स-डे निमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

नीलेश अडसूळ

KK Daughter Taamara : काल १९ जून रोजी जगभरात फादर्स डे साजरा करण्यात आला. मनोरंजन विश्वातील अनेक तारे तारकांनी आपल्या वडिलांविषयी भावना व्यक्त केल्या. पण या सगळ्यात एक अत्यंत भावनिक पोस्ट पाहायला मिळाली. जी पाहून आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात चटकन पाणी येईल. ही पोस्ट आहेत गायक केके यांच्या मुलीची. गायक केके यांचे नुकतेच निधन झाले. फादर्स डे ला ही पोकळी त्यांच्या मुलीला तमाराला प्रकर्षाने जाणवली. तिने काही जुने फोटो पोस्ट करत आपल्या वडिलांविषयी लिहिले आहे. (KK's daughter Taamara pens heartbreaking Father's Day post, says 'life is dark without you dad')

प्रसिद्ध गायक केके (KK) यांचे 31 मे रोजी निधन झाले. वयाच्या 53 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केके बॉलिवूडमधील एक सुप्रसिद्ध गायक होते. त्यांनी हिंदीमध्ये 200 हून अधिक गाणी गायली. Voice of Love अशी त्यांची ओळख होती. पत्नी ज्योती लक्ष्मी कृष्णा आणि दोन मुलं असं केके यांचे कुटुंब आहे. यंदा फादर्स डे ला ते कुटुंबासोबत नाही. त्यांच्या आठवणीत मुलगी तमारानं एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

तमारा म्हणते, 'तुमच्या जाण्याचं दु:ख मी मोठं आहे. तुमच्याशिवाय जगणं तर त्याहून कठीण आहे. तुम्ही जगातील सर्वात क्युट आणि प्रेमळ वडील होता. तुम्ही नेहमी कॉन्सर्टवरुन घरी आल्यानंतर आम्हाला जवळ घेऊन बसायचा. बाबा, मला तुमची खूप आठवण येते. तुमच्यासोबत जेवण करणं, तुमच्यासोबत हसणं, तुमचा हात पकडणं या सर्व गोष्टी आज आठवतात. या जगातील सर्वात बेस्ट वडिलांना फादर्स-डेच्या शुभेच्छा. मला माहित आहे तुम्ही आमच्यासोबत आहात.' असं तमाराने लिहिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT