kl rahul and athiya shetty  Sakal
मनोरंजन

Athiya Shetty: “अथिया घरात कोणालाच…” , लग्नानंतर पत्नीबद्दल केएल राहुलने केला खुलासा

केएल राहुल आणि अथिया शेट्टीचे गेल्या महिन्यात सुनील शेट्टीच्या खंडाळा फार्महाऊसवर लग्न झाले.

सकाळ डिजिटल टीम

क्रिकेटर केएल राहुलने आता लग्नानंतर अथिया शेट्टीसोबतच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. तो म्हणाला की अथिया शेट्टीला संपूर्ण कुटुंब घाबरते. केएल राहुल आणि अथिया शेट्टीचे गेल्या महिन्यात सुनील शेट्टीच्या खंडाळा फार्महाऊसवर लग्न झाले.

यावेळी सुनील शेट्टी यांनी फोटोग्राफरचे आभारही मानले होते. लग्नानंतरच्या वेडिंग रिसेप्शनची माहिती देताना ते म्हणाले की, ते आयपीएलनंतर होईल.

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत के.एल.राहुलने अथियाबद्दल वक्तव्य केलं आहे. अथिया राहुलला विचारत आहे की ती कुटुंबातील कोणत्या व्यक्तीला घाबरते. यावर केएल राहुल म्हणतो, 'तू तुझ्या आईच्या जवळ आहेस आणि संपूर्ण कुटुंब तुला घाबरते आणि तू कोणाला घाबरत नाहीस.'

दोघांनाही विचारण्यात आले की कोण चांगला स्वयंपाक करतो ? यावर अथिया म्हणाली की लॉकडाऊनमध्ये तिने यावर काम केले होते पण केएल राहुल चांगला स्वयंपाक करतो.

जेव्हा केएल राहुलला विचारण्यात आले की सर्वात मजेदार कोण आहे. यावर केएल राहुल म्हणतो की तो स्वतः. त्याचवेळी अथिया यावर म्हणते, 'ती मी आहे.' जेव्हा त्यांना विचारण्यात आले सगळ्यात पाहिलंत सॉरी कोण बोलतं. यावर अथियाने उत्तर दिले की, ती नेहमी सॉरी बोलते.

मग केएल राहुल म्हणतो कारण तो नेहमीच चुकीचा असतो. दोघांमध्ये जिद्दी कोण असा प्रश्न दोघांना विचारला असता दोघांनी एकमेकांकडे बोटे दाखवली.

अथिया शेट्टी आणि केएल राहुलने लग्नानंतर फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. यामध्ये आलिया भट्ट, कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी आणि अनन्या पांडे सारख्या लोकांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Update: पहाटेपासूनच मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात; रस्त्यांना तलावाचे स्वरूप, पाच दुर्घटनांनी वाढवली चिंता!

'धुरंधर'नंतर रणवीरची नवी खेळी! यावेळी शत्रू माणसं नाहीत, तर..., 300 कोटींच्या सिनेमाची जोरदार चर्चा

Ayodhya Temple Theft : अयोध्या मंदिर दानचोरी! महाकुंभ काळात सर्वाधिक अपहार, मेहुण्यांनी लाटले कोट्यवधी; मालमत्ता खरेदी

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Pune Crime : ‘एपीआय’ला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

SCROLL FOR NEXT