KL Rahul Set to Tie the Knot With Athiya Shetty Later This Year? Google
मनोरंजन

ठरलं! केएल राहुल अथिया शेट्टीसोबत घेणार सात फेरे; कधी,कसा रंगणार सोहळा?

बॉलीवूड अभिनेता सुनिल शेट्टीची मुलगी अथियाचं गेल्या काही वर्षांपासून क्रिकेटर केएल राहुलसोबत असलेल्या रीलेशनशीपच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या.

प्रणाली मोरे

बॉलीवूड अभिनेता सुनिल शेट्टीची(Suniel Shetty) मुलगी अथियाचं (Athiya Shetty) गेल्या काही वर्षांपासून क्रिकेटर केएल राहूल(KL Rahul)सोबत असलेल्या रीलेशनशीपच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. अथिया आणि केल राहुलला नेहमीच अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून एकत्र पाहिलं जातं. हे दोघे एकमेकांना डेट करीत आहेत याची बातमी तर मीडियानं याआधीच दिली आहे. सोशल मीडियावर देखील अथिया आणि केएल राहून एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करीत असतात.

आता तर केएल राहुल आणि अथियाच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. पिंकव्हिला या इंग्रजी वेबसाइटला मिळालेल्या माहितीनुसार अथिया शेट्टी आणि केएल राहुल आपल्या नात्याला पुढे नेण्याचा विचार करीत आहेत. हे दोघे यावर्षी लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे. वेबसाइटनं दिलेल्या बातमीनुसार क्रिकेटर आणि अभिनत्री दोघे दाक्षिणात्य परंपरेनुसार विधीवत लग्न करणार आहेत. शेट्टी कुटुंबाच्या जवळच्या सूत्रांनुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे कळत आहे की, आता केएल राहुल आणि अथियाचं कुटुंब लग्नाच्या सगळ्या पुढच्या तयारीसाठी एकमेकांच्या संपर्कात आहेत.

सगळं नीट जुळून आलं तर २०२२ वर्ष संपायच्या आत अथिया शेट्टी आणि केएल राहुल लग्नबंधनात अडकणार आहेत. अद्याप यासंदर्भात कोणती अधिकृत घोषणा कपल किंवा त्यांच्या कुटुंबातर्फे करण्यात आलेली नाही. अथिया आणि केएल राहुल खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करीत आहेत. नेहमीच अनेक ठिकाणी एकत्र दिसतात, किंवा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटोही शेअर करीत असतात. कधी अथिया राहुलला वाढदिवसाच्या रोमॅंटिक शुभेच्छा देताना दिसते तर कधी राहुल अथियाच्या फोटोवर कमेंट करताना दिसतो. अथियानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर राहुलला मिठी मारलेले काही फोटो शेअर केले होते. आता त्या फोटोंवरुन प्रत्येकानं अंदाज लावला की यांच्यात नक्कीच काहीतरी सुरु आहे. पण आता लग्नाची बातमी व्हायरल झाल्यानं दोघांचे चाहते मात्र नक्कीच सुखावले असणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : अमित ठाकरे सपत्नीक वरळी डोममध्ये पोहचले; राज अन् उद्धव ठाकरेही रवाना

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT