Milind Soman 
मनोरंजन

मिलिंद सोमणचा सहजसोपा डाएट प्लॅन

तुम्हीसुद्धा करू शकता फॉलो

स्वाती वेमूल

मॉडेल, अभिनेता आणि 'फिटनेस फ्रीक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिलिंद सोमणचा Milind Soman डाएट प्लॅन Milind Soman Diet plan कसा असतो, याविषयी अनेकांना उत्सुकता असेल. मिलिंदने स्वत: सोशल मीडियावर त्याचा डाएट प्लॅन सांगितला होता. दिवसभरातील त्याचं हे रुटीन अत्यंत साधंसोपं असून तुम्हीसुद्धा ते फॉलो करू शकता. मिलिंदच्या दिवसाची सुरुवात अर्धा लिटर पाणी पिण्यापासून होते. हे पाणी अत्यंत थंड किंवा गरम नसतं. साधं रुम टेम्परेचरचं पाणी तो पितो. त्यानंतर सकाळी दहा वाजताच्या सुमारास तो नाश्ता करतो. नाश्त्यामध्ये सुका मेवा, एक पपई, एक कलिंगड किंवा ऋतुनुसार उपलब्ध असणारे एखादे फळ, उदा. चार आंबे.

दुपारी दोन वाजताच्या सुमारास तो जेवण करतो. भात किंवा दाल खिचडी आणि उपलब्ध असणाऱ्या भाज्या. भाजीचं प्रमाण डाळ किंवा भातापेक्षा अधिक असतं. भातावर दोन टेबलस्पून घरी बनवलेलं साजूक तूप. कधी कधी भाताऐवजी सहा चपात्या, भाजी आणि डाळ. फार क्वचित किंवा महिन्यातून एखाद्या दिवशी अगदी थोडं प्रमाणात चिकन किंवा मटण किंवा अंड यांचा समावेश असतो.

पाच वाजताच्या सुमारास एक कप कोरा गुळाचा चहा तो पितो. त्यानंतर संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास तो जेवण करतो. रात्रीच्या जेवणात एक प्लेज भाजी आणि अगदीच भूक असेल तर खिचडीचा समावेश करतो. रात्री जेवणात मांसाहार कधीच करत नसल्याचं त्याने स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे रात्री झोपण्यापूर्वी हळद आणि गूळ टाकून गरम पाणी पितो. साखरेऐवजी गुळाचं सेवन करण्यावर तो भर देतो. गोड पदार्थांमध्ये, डेझर्टमध्येही गूळ असलेलेच पदार्थ तो खातो.

रिफाइन्ड, प्रोसेस्ड आणि पॅकेज फूडपासून तो लांबच राहतो. याशिवाय फिट राहण्यासाठी तो कोणतेच सप्लिमेंट्स किंवा व्हिटामिन्सच्या गोळ्या खात नाही. दिवसभरात जेवढी तहान असेल तेवढं साधं पाणी तो पितो. यात कधीच कोल्ड ड्रिंक्स किंवा इतर सॉफ्ट ड्रिंक्सचा समावेश नसतो. वर्षातून एकदा किंवा दोनदाच तो मद्यपान करतो. मद्यपानाचं प्रमाणही फक्त एक ग्लास इतकं ठेवतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Omraje Nimbalkar: दिल्लीतून फोन; धाराशिवमध्ये घोषणा! पक्षबदलाच्या निर्णयामागे नेमके काय घडले? ओमराजेंनी प्रथमच सांगितली पडद्यामागची कथा

T20 WC, IND W vs SA W : स्मृती-शफालीची तुफान सुरुवात, पण द. आफ्रिकेने आवळले फासे; तरीही टीम इंडिया दीडशे पार

विश्वासावर प्रश्नचिन्ह, विकासाची कोंडी, सत्तेची गरज...; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील बंडखोर खासदाराने पक्ष सोडण्याची कहाणी सांगितली!

NEET 2026 Retest: NEET पुनर्परीक्षा अवघड: भौतिकशास्त्र-रसायनशास्त्राने विद्यार्थ्यांची कसोटी, कट-ऑफ व गुणवत्ता यादीवर परिणामाची शक्यता

PM Kisan eKYC : तांत्रिक अडचणींनी पीएम किसान ई-केवायसी ठप्प; हजारो शेतकरी हप्त्यापासून वंचित होण्याची भीती

SCROLL FOR NEXT