Know abour Neha Kakkar's Success story
Know abour Neha Kakkar's Success story esakal
मनोरंजन

HBD Neha Kakkar: इंडियन आयडलच्या रिजेक्शनपासून ते शो ची जज होण्यापर्यंतचे कठोर परिश्रम

सकाळ ऑनलाईन टीम

तरूणांच्या पिढीतील सर्वांची आवडती आणि प्रसिद्ध गायिका नेहा कक्करची गाणी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात.नेहाला गायन क्षेत्रात तिचे हे स्थान प्रस्थापित करण्यासाठी मात्र कठोर परिश्रम घ्यावे लागले होते.आज नेहा तिचा ३३ वा वाढदिवस(Birthday) साजरा करतेय.तिच्या वाढदिवशी जाणून घेऊया तिची सक्सेस स्टोरी.

खरं नेहा कक्करला लहानपणापासूनच गायनाचा वारसा लाभलाय असे म्हणायला हरकत नाही.(Neha Kakkar)नेहाचे संपूर्ण कुटुंब हे गायनात निपूण होते.नेहाने फार कमी वयात संघर्षाच्या वाटचालीला सुरूवात केली आणि आज नेहाची प्रसिद्धी आपल्या सर्वांपुढे आहे.

जाणून घेऊया नेहाचा संघर्ष

नेहा अवघ्या चार वर्षांची होती जेव्ही तिने जागरणात गायला सुरूवात केली होती.नेहाने रूषिकेशमधे एका रूमच्या घरात आईवडिल आणि भावंडं सोनू आणि टोनी यांच्यासह बालपण घालवले.(Sonu Kakkar)नेहाने 'इंडियन आयडल २' मधे दिलेल्या ऑडिशनमधे अनू मलिक या गायकाकडून त्यावेळी नेहाला रिजेक्शन मिळाले होते.(Tony Kakkar)आज मात्र याच शोच्या जज पदाचा मान मिळालेला दिसतो.

नेहाने आतापर्यंत अनेक हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमधे काम केलेय.'कॉकटेल' या चित्रपटाच्या 'सेकेड हँड' जवानी या गाण्यानंतर तिची एक वेगळी ओळख निर्माण व्हायला सुरूवात झाली होती.'दिल को करार आया' या गाण्यानंतर नेहाचे चांगले दिवस सुरू झालेत.कारण या गाण्यानंतर तिला जी प्रसिद्धी मिळाली ती आज आपल्या सर्वांपुढे आहे.नेहाचा चाहता वर्ग फार मोठा आहे.तिचे इन्स्टाग्रामवर तब्बल ७० मिलीयन फॉलोवर्स आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरू - गुजरात येणार आमने-सामने; स्पर्धेतील आव्हान टिकवण्याचं दोन्ही संघांसमोर आव्हान

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT