Koffe With karan 7: Ananya Pandey on dating with Aditya Roy Kapur... Instagram
मनोरंजन

KWK 7: 'माझ्या बर्थ डे पार्टीत अनन्या आणि आदित्य...,मी पाहिलं',करणचा खुलासा

करण जोहरच्या कॉफी विथ करण ७ या चॅट शोच्या चौथ्या एपिसोडमध्ये विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे गेस्ट म्हणून उपस्थित होते.

प्रणाली मोरे

करण जोहरचा(Karan Johar) कॉफी विथ करण(Koffee With karan) हा शो त्यामध्ये विचारले जाणारे प्रश्न आणि त्यावरनं निर्माण होणाऱ्या कॉन्ट्रोव्हर्सीजमुळे नेहमीच चर्चेत पहायला मिळतो. यावर्षी देखील पहिल्याच एपिसोडपासून शो चर्चेत आला आहे. यावर्षी करणच्या शो मध्ये जरा जास्तच साऊथ स्टार्स पहायला मिळणार आहेत. नुकतेच शो मध्ये अक्षय कुमारसोबत समंथा रुथ प्रभू आलेली सर्वांनीच पाहिली असणार. त्यांच्या एपिसोडच्या काही क्लीप्स सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल्या. आतापर्यंत ३ एपिसोड्स स्ट्रीम करण्यात आले आहेत. या शो चा चौथा एपिसोड येत्या गुरुवारी रीलिज होतोय. याचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे. ज्यामध्ये करण जोहर विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेला(Ananya Pandey) काही असे प्रश्न विचारताना दिसत आहे जे ऐकून सारेच शॉक होत आहेत.(Koffe With karan 7: Ananya Pandey on dating with Aditya Roy Kapur...)

कॉफी विथ करणच्या चौथ्या एपिसोडमध्ये सध्याची हॉट जोडी,लाइगर अॅक्टर्स अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा दिसणार आहेत. या एपिसोडमध्ये करणने जे प्रश्न या दोघांना विचारले आहेत त्याच्यावर कलाकारांची उत्तरंही तितकीच थेट आहेत. पण अर्थातच ते ऐकल्यावर चाहत्यांचे मात्र चांगलेच मनोरंजन होईल.

या एपिसोडच्या प्रोमोच्या सुरुवातीला करण मजेदार स्टाईलने या दोन कलाकारांची ओळख करुन देतो. तो विजय देवरकोंडाला विचारतो,'तुला चीज आवडतं?' हा प्रश्न ऐकल्यावर विजयच्या चेहऱ्यावरचे हावभाव एकदम बदलतात. पण तो त्यातही खूपच क्यूट दिसत आहे. त्या शो मध्येच मग सारा आणि जान्हवीच्या एपिसोडमधली एक क्लीप लागते, ज्यामध्ये त्या दोघी म्हणत असतात विजय देवरकोंडा हा चीज प्लॅटर आहे. त्यावर अनन्या म्हणते कशी, ती पण त्याच चीज प्लॅटर मध्ये सामिल होऊ शकते का?

तेवढ्यात अनन्याला करणने विचारलेला प्रश्न सगळ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो. करण अनन्याला विचारतो,'तिच्यात आणि आदित्य रॉय कपूरमध्ये काय सुरु आहे? ते डेटिंग करत आहेत का?' पण हे ऐकल्यावर मात्र अनन्याच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले दिसतात.

एवढ्यात करण अनन्याला चांगलाच कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करताना दिसतो. करण आपल्या वाढदिवसाच्या पार्टीची आठवण काढत म्हणतो,'तू आणि आदित्य रॉय कपूर एकत्र पार्टीत काय करत होतात?' बस्स, एवढं ऐकल्यावर अनन्याच्या तोंडावर बारा वाजतात. त्यानंतर स्वतःचे हावभाव लपवत ती करणला गप्प बसण्याचा इशारा करते. पण तरीदेखील ऐकेल तो करण जोहर कसला. तो काही गोष्टींचा खुलासा करण्याचा प्रयत्न करतो. पण अनन्या त्याला काही बोलू देत नाही. आता आदित्य रॉय कपूर आणि अनन्या डेटिंग करत आहेत का, करणच्या बर्थ डे पार्टीत ते दोघे एकत्र काय करत होतो जे करणने पाहिले हे सगळे एपिसोड स्ट्रीम झाल्यावरच कळेल. कॉफी विथ करणचा हा एपिसोड गुरुवारी डिस्ने हॉट स्टारवर स्ट्रीम केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Municipal Election 2026 : चंद्रपुरात भाजपा सत्ता राखणार? 'या' प्रभागातील लढतीकडे सर्वाचं लक्ष, प्रतिष्ठा पणाला

Pune Voter Awareness : मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोग ॲक्शन मोडमध्ये; हडपसर परिसरात 'स्विप'चा जागर!

Nagpur Municipal Election 2026 : नागपूरमध्ये 'या' प्रभागात चुरशीची लढत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी वर्चस्वाची लढाई

ZP Election Date 2026 : जिल्हा परिषद निवडणुका मार्च-एप्रिलपर्यंत लांबणार नाही; 'थेट तारीख' निश्चित झाल्याने राजकीय रणधुमाळीला वेग!

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाच्या संजनाताई पाटील यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT