Koffee with Karan 7: karan Johar answer to kangana Ranaut Comment  Google
मनोरंजन

'कॉफी विथ करण 7' च्या पहिल्या भागातच कंगनावर करणचा पलटवार,म्हणाला...

'कॉफी विथ करण 7' च्या पहिल्या भागात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट गेस्ट म्हणून हजर राहिले होते.

प्रणाली मोरे

तीन वर्षानंतर 'कॉफी विथ करण 7'(Koffee with karan7) या शो नं धमाकेदार सुरुवात केली आहे. पहिल्याच भागात करण जोहर आपल्या शो च्या प्रसिद्धिविषयी बोलताना भावूक झालेला देखील दिसला. शो सुरु झाल्यानंतर करण जोहरने आपल्या ट्रोलर्सवर चांगलाच पलटवार केलेला दिसला. आता करणची सगळ्यात मोठी ट्रोलर पाहिली तर कंगना रनौत(Kangana Ranaut) आहे. ही गोष्ट कोणापासून लपली नाहीय. यामध्ये मग प्रश्न उठतो की खरंच करण जोहरने बोलता-बोलता कंगनावरच पलटवार केलेला नाही ना? चला, जाणून घेऊया नेमका करण काय बोलला आहे.(Koffee with Karan 7: karan Johar answer to kangana Ranaut Comment)

करण म्हणाला की,''त्याला वाटलेलं की हा शो पुन्हा सुरू होणार नाही. पण आलियानं याबाबतील मला खूप पाठिंबा दिला. करण म्हणाला,त्याने आणि आलियाने याचा विचार केला नव्हता की हा शो पुन्हा सुरु होईल. गेली २ वर्ष मनोरंजन क्षेत्रासाठी खूप कठीण गेली. आणि माझ्यासाठी तर खूपच अडचणीचा काळ होता. 'कॉफी विथ करण 7' सुरु होण्याची चिन्ह दिसताच कुठूनतरी कुणीतरी डोकं वर काढायचं आणि अटॅक करायचं. माझ्यावर देखील या शो मुळे खूप शाब्दिक हल्ले चढवले गेले. माझ्या नावापुढे सापाचा इमोजी सुद्धा लोक द्यायचे''.

पण अशा प्रसंगात रणवीर आणि आलियानं त्याची खूप साथ दिली,करणला विश्वास दिला की 'कॉफी विथ करण7' पुन्हा सुरू होणार. रणवीर म्हणाला,''करण जोहर या शो चे खूप सिझन करेल की नाही अशी शंका माझ्या मनात कधीच आली नाही. कारण ट्रोल करुन उगाचच बोलणं या सगळ्याच गोष्टी खूप निरर्थक वाटतात''. यावर करण रणवीरचं समर्थन करताना म्हणाला,''मला वाटतं बेसलेस,नेमलेस लोकं टी.व्ही वर खूप चुकीच्या गोष्टी बोलतात. मला कळत नाही लोक मला साप का बोलतात''.

यानंतर रणवीरनं गंभीर वातावरण थोडं हलकं-फुलकं करत करण जोहरच्या सगळ्या टीकाकारांना उत्तर देत म्हणाला,''करणला एकटं सोडा. तो माझा 'गुड्डा' आहे''. रणवीरचा हा शब्द ऐकून तिथे उपस्थित आलिया-करणही जोरात हसायला लागले.

कंगना आणि करणमधील वादाविषयी बोलायचं झालं तर त्यांचे भांडण खूप जुने आहे. कंगनाने करणच्या शो मध्ये येऊन त्याला 'नेपोटिझम किंग' आणि 'मूवी माफिया' संबोधलं होतं. तेव्हापासून आजतागयत कंगना करणवर नेहमीच शाब्दिक हल्ले करताना दिसली आहे. करण देखील कंगनावर बोलता-बोलता पलटवार करताना दिसतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT