Karan Johar Google
मनोरंजन

Koffee With Karan 7: ट्रोलर्सवर पलटवार करत करणने जाहीर केली शो ची तारीख...

'कॉफी विथ करण 7' मध्ये कतरिना-विकी ते रणबीर-आलिया असे बडे स्टार्स हजेरी लावणार असल्याचं बोललं जात आहे.

प्रणाली मोरे

बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर(Karan Johar) आपल्या सिनेमांसोबतच 'कॉफी विथ करण' या आपल्या चॅट शो मुळे देखील प्रसिद्ध आहे. त्याचा हा शो लोकांच्या पसंतीस उतरला आहे. या शो मध्ये फिल्म इंडस्ट्रीतले अनेक सेलिब्रिटी सामिल होतात आणि करणच्या एक्सक्लुसिव्ह प्रश्नांची उत्तरं देखील देतात. खरंतर या शो मध्ये करण खूप वैयक्तिक प्रश्न देखील विचारतो,तसंच अनेकदा मजेदार प्रश्नांचा देखील भडिमार असतो.(Koffee With Karan 7 release date, promo viral)

कधी या प्रश्नांमुळे शो मध्ये आलेले सेलिब्रिटीच नाही तर सर्वसामान्य प्रेक्षक देखील थक्क होतात. आता या शोच्या सातव्या सीझनची चर्चा अनेक दिवसांपासून रंगली आहे. शो चा नवा प्रोमो देखील समोर आलेला आहे,ज्यामध्ये करण स्वतःलाच ट्रोल करताना दिसत आहे. इतकंच नाही तर तो स्वतः फोन करुन,सेलिब्रिटींच्या हाता-पाया पडून त्यांना शो मध्ये येण्यासाठी विनवणी करताना दिसतोय.

करण जोहरने सोशल मीडियावर 'कॉफी विथ करण 7'(Koffee With Karan 7) सिझनचा एक नवा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये तो म्हणताना दिसत आहे की,''सगळेजण या शो ला पसंत करतात आणि याच्या नव्या सीझनच्या प्रतिक्षेत आहेत..'' यानंतर स्क्रीनवर लोकांचे ट्वीट दिसू लागतात,जे त्याला अर्थातच ट्रोल करणारे आहेत. कोणी लिहिलं आहे- 'म्हाताऱ्या किती सिझन तू करणार?' तर कोणी लिहिलंय-'बॅन करा याला'. पण करण या सगळ्या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करत पुढे म्हणतो कसा,''पण सगळ्यांनाच हा शो आवडतो त्याचं काय करायचं''.

त्यानंतर या व्हिडीओत करण चाहत्यांना शो मध्ये येण्याचं निमंत्रण हटके स्टाईलमध्ये देतो. मी तुम्हाला कुठलाच वैयक्ति प्रश्न विचारणार नाही असं वचनही करण चाहत्यांना देताना दिसतोय. करणचा हा अंदाज सगळ्याच नेटकऱ्यांना भलताच आवडलाय,त्यामुळे सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

तर करण जोहरचा हा शो ७ जुलैपासून सुरू होत आहे. आपण या शो ला डिस्ने हॉटस्टारवर पाहू शकता. बोललं जात आहे की या शो मध्ये कतरिना कैफ-विक्की कौशलपासून ते रणबीर कपूर-आलिया भट्ट पर्यंत मोठमोठे सितारे येणार आहेत. अर्थात,अद्याप गेस्ट लिस्ट गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT