Koffee With Karan 8 Kareena Kapoor and Alia on show Karan Johar reminds Kareena how Ameesha Patel replaced  Esakal
मनोरंजन

Koffee with Karan 8: अमिषाचं नाव घेताच करिनाने तोंड केलं वाकडं तर आलियाने... करणच्या शोमध्ये होणार नवा वाद?

'कॉफी विथ करण 8' च्या आगामी एपिसोडमध्ये आलिया भट्ट आणि करीना कपूर करण जोहरच्या प्रश्नांना उत्तर देताना दिसणार आहेत.

Vaishali Patil

Kareena and Alia on Koffee with Karan Johar: करण जोहर हे नाव सध्या त्याचा चॅट शो कॉफी विथ करण खूपच चर्चेत आहे. या शोचा आठवा सीझन सुरु झाला असून आतापर्यंत या शोचे तीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

या शोमध्ये यापुर्वी दीपिका आणि रणवीरची जोडी आणि त्यानंतर देओल भावंडं प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. तर तिसऱ्या भागात अनन्या आणि सारा अली खान यांनी या शोमध्ये करणसोबत गप्पा मारल्या होत्या.

आता पुढच्या एपिसोडमध्ये एक नवीन जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ही जोडी आहे आलिया भट्ट आणि करीना कपूर खान यांची.

करणच्या शोमध्ये या दोघी अनेक धक्कादायक खुलासे करणार आहे. या एपिसोडमध्ये करण करिना आणि आलियाला अनेक प्रश्न विचारताना दिसत आहे.

सध्या या एपिसोडचा प्रोमो सोशल मिडियावर शेयर करण्यात आला आहे. या प्रोमोत आलियाने करणच्या शोला वादग्रस्त शो म्हटलं आहे.

तर दुसरीकडे करण जोहर करीनाला अभिनेत्री अमिषा पटेलसोबतच्या तिच्या मागील भांडणाबद्दल बोलताना दिसत आहे. करण विचारतो की, 'अमिषा पटेलसोबत तुझे काही भांडण झाले आहे का?'.

यावर बेबो म्हणते, 'मला याविषयी आणि कोणत्या भांडणाबद्दल काही बोलायचे नाही?'. करण सांगतो की, आधी तू 'कहो ना प्यार है' या रोमँटिक चित्रपटात काम करणार होतीस, पण नंतर अमिषा पटेलला त्या चित्रपटात भूमिका मिळाली. हे ऐकताच करिना करणकडे दुर्लक्ष करते.

या शोमध्ये आलियाने काळ्या रंगाचा गाऊन घातला आहे तर करीना पूर्ण पांढर्‍या ड्रेसमध्ये दिसली.

या शोच्या पुढिल भागात भागात काजोल आणि राणी मुखर्जी, अजय देवगण आणि रोहित शेट्टी दिसणार आहेत.

आलिया भट्ट आणि करीना कपूरचा हा नवा एपिसोड डिस्ने+हॉटस्टारवर 16 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT