koffee with karan 8 sharmila tagore talk about saif ali khan amrita singh marriage SAKAL
मनोरंजन

Koffee With Karan 8: वयाने १३ वर्ष मोठ्या अमृताशी लग्न केल्यावर सैफची आई शर्मिला यांची काय होती पहिली प्रतिक्रिया?

१३ वर्ष मोठ्या अमृताशी लग्न झाल्यावर सैफची आई शर्मिला यांची काय होती प्रतिक्रिया?

Devendra Jadhav

Koffee With Karan 8 News: 'कॉफी विथ करण 8' शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. 'कॉफी विथ करण 8' शोमध्ये सैफ अली खान आणि त्याची आई शर्मिला टागोर सहभागी झाली होते.

या शोमध्ये शर्मिला टागोर यांनी सैफने जेव्हा अभिनेत्री अमृता सिंगशी लग्न केलं तेव्हा शर्मिला टागोर यांची प्रतिक्रिया काय होती, याविषयी रोखठोक खुलासा केलाय. काय म्हणाल्या शर्मिला जाणून घ्या.

सैफच्या या निर्णयामुळे शर्मिला टागोर दुखावल्या

'कॉफी विथ करण'मध्ये करण जोहरच्या प्रश्नाला उत्तर देताना शर्मिला टागोर यांनी सैफच्या अमृतासोबतच्या लग्नाची कहाणी सांगितली. ज्यामध्ये त्यांनी घटस्फोटाचाही उल्लेख केला आणि संपूर्ण कुटुंबावर सैफ - अमृताचं लग्न आणि घटस्फोट या गोष्टींचा कसा परिणाम झाला, हे सांगितले.

शर्मिला यांना सैफ - अमृताचं हे लग्न होऊ द्यायचे नव्हते. आणि म्हणूनच त्यांनी सैफ अली खानच्या लग्नला नकार दिला.

पण जेव्हा त्यांना कळलं की, सैफने त्यांच्या नकळत एक दिवस आधीच लग्न तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आणि सैफच्या या निर्णयामुळे आई शर्मिला दुखावल्या.

सैफने सांगितले लग्नाचे कारण

यानंतर सैफ अली खानने २१ व्या वर्षी १३ वर्ष मोठ्या असलेल्या अमृता सिंगसोबत लग्न करण्याच्या निर्णयाबद्दल उघडपणे बोलला.

तो म्हणाला, "असं लग्न करणं हे घरातून पळून निघून जाण्यासारखे होते. बर्‍याच गोष्टी घडत होत्या, आणि त्यामुळे मला एक प्रकारची सुरक्षितता जाणवत होती. मला हे सर्व आवडत होते. मला असे वाटले की, मी माझे स्वतःचे कुटुंब आणि घर तयार करू शकेन. म्हणूनच मी ते केले."

अमृताच्या नात्याबद्दल काय म्हणाला सैफ?

सैफने यावेळी सांगितले की, वयाच्या 20 व्या वर्षी त्याचे लग्न झाले आणि इतर गोष्टी बदलल्या. असे असूनही, त्याची पुर्व पत्नी अमृता सिंग त्याचा मोठा आधार होती.

यानंतरही दोघांमध्ये चांगलं नातं निर्माण झाले आणि त्यांनी मिळून त्यांची मुले सारा आणि इब्राहिम यांना वाढवले.

याशिवाय जेव्हा सैफने करिनाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा अमृताने तिच्या मुलांची मानसिकता या लग्नासाठी कशी तयार केली, याचंही सैफने कौतुक केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Ramesh Thorat : माजी आमदार रमेश थोरात घड्याळ हाती बांधण्याच्या तयारीत; अशोक पवार मात्र पक्षातच समाधानी

Latest Marathi News Updates: माझ्या स्तरावर मी गंभीर दखल घेतली आहे - राहुल नार्वेकर

MLA Rahul Kul : उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बुडीत बंधारे उभारावेत; आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Mahadev Munde Case: खळबळजनक! '‘महादेव मुंडे खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला वाल्मीकने संपवलं’', आकस्मिक मृत्यूचा बनाव

Eleventh Admission : अकरावीच्या दुसऱ्या फेरीत राज्यातील दोन लाख ५१ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश

SCROLL FOR NEXT