dhanush
dhanush 
मनोरंजन

'कोलावरी डी' फेम धनुषचा वर्कआऊट व्हिडिओ होतोय ट्रेंड..

सकाळ डिजिटल टीम

मुंबई- व्हाय धीस कोलावरी डी फेम गायक-अभिनेता आणि सुपरस्टार रजनीकांतचा जावई धनुष पुन्हा एकदा चर्चेत आलाय. यावेळी तो कोणत्या गाण्यासाठी किंवा सिनेमासाठी नाही तर त्याच्या इंटेन्स वर्कआऊटसाठी चर्चेत आहे. ही व्हिडिओ क्लिप धनुषच्या २०१८ मधील 'मारी २' सिनेमाच्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन शेअर केली गेली आहे. धनुषचा हा माचो अवतार पाहून चाहते त्याच्या प्रेमात पडले आहेत. 

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेला धनुषचा हा व्हिडिओ एका क्लायमॅक्स ऍक्शन सीनच्या आधी स्वतः तयार होतानाचा आहे. याआधी धनुषला सिनेमांमध्ये, गाण्यांमध्ये किंवा कोलावरीच्या गाण्यांमध्ये जसं पाहिलं होतं त्यापेक्षा तो  या व्हिडिओमध्ये अगदी वेगळा दिसतोय. धनुषच्या धष्टपुष्ट शरिरयष्टीसोबत मोठ्या मिशा आणि दाढीमझध्ये धनुषचा वेगळाच अवतार पाहायला मिळतोय. 

२०१३ मध्ये आलेल्या आनंद एल राय यांच्या 'रांझणा' या हिंदी सिनेमामध्ये तमिळ स्टार धनुष सुद्धा होता. या सिनेमातील त्याच्या जबरदस्त अभिनयाने त्याने अनेकांची मनं जिंकली होती. या सिनेमात धनुषसोबत अभय देओल, स्वरा भास्कर आणि सोनम कपूर देखील होते. साऊथच्या या सुपरस्टार धनुषने त्याच्या सिनेकारकिर्दीची सुरुवात 'थुल्लोवदो इलीमाई' या २००२ मध्ये रिलीज झालेल्या सिनेमातून केली होती. मात्र धनुषला बॉलीवूडच्या चाहत्यांना त्याची खरी ओळख झाली ती 'व्हाय धीस कोलावरी डी' या गाण्याने.

२०११ मध्ये हे गाणं युट्युबवर धनुषने अपलोड केलं होतं. यानंतर हे गाणं धनुषच्या गाण्याच्या स्टाईलमुळे आणि गाण्याचे हटके बोल यामुळे एवढं व्हायरल झालं की या गाण्याचं अर्थ अनेकजण शोधायला लागले. इतकंच नाही तर स्टुडिओमध्ये शूट केलेलं हे गाणं जसंच्या तसं अपलोड केल्याने हा एक वेगळाच स्टुडिओमधील गाण्यांचा ट्रेंड सुरु झाला. आणि देशभरात धनुषला एक वेगळीच ओळख मिळाली. त्यानंतर मग धनुष हा रजनीकांतचा जावई असल्याचं अनेकांना कळालं.  

kolaveri di singer south star dhanush trending on social media for his intense workout video  
  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT