Shivaji University  Sakal News
मनोरंजन

कोल्हापुर : शिवाजी विद्यापीठातील भव्य अश्वारूढ पुतळा

घोड्याचा रेटलेला उजवा पाय आणि शिवरायांचे रिकिबीमधले

राजेश नागरे

कोल्हापुरातील छत्रपती शिवरायांचा सर्वांत मोठा पुतळा कोणता असेल तर तो शिवाजी विद्यापीठात असणारा अश्वारूढ पुतळा. साधारण १५ ते १६ फूट उंचीचा असा हा पुतळा अत्यंत आवेशपूर्ण आणि अश्वाच्या गतीवरील महाराजांचे पूर्ण नियंत्रण दर्शवते. अश्वारूढ शिवराय त्यांच्या वाटचालीमधील विजयाच्या उत्तुंग अवस्थेत उंच कड्यावर उभारल्याचा भास येथे होतो. उजवा पाय अगदी टोकाला थांबवलेल्या अवस्थेत आहे. शिवरायांनी घोड्याचा ओढलेला लगाम आणि तत्क्षणी थांबलेला घोडा अशी चित्तथरारक रचना या पुतळ्याची आहे.

प्रसिद्ध शिल्पकार बी. आर. खेडकर यांनी हा पुतळा बनवला असून त्यांनी आपलं कसब पणाला लावलेले दिसते. घोडा आणि घोड्यावर बसलेली व्यक्ती यांचे एक विशिष्ट नाते असते, ते येथे अनुभवता येते. वेगाबरोबरच आपल्याला हवा तसा घोडा नियंत्रित करणे हे फार मोठे कसब दर्शवून महाराजांची स्वतःच्या मनावरील पकड या शिल्पाच्या रचनात्मक क्षणात शिल्पकारांनी शिल्पांकित केल्याचे आपण अनुभवू शकतो.

या शिल्पातली शिवरायांची प्रतिमा ही समाजमनामध्ये परंपरेने जोपासली गेलेल्या पारंपरिक कल्पनेप्रमाणे घडवली आहे. डाव्या हातात खेचलेला लगाम, उजव्या हातात तलवार, उठावदार चेहरा आणि बलदंड शरीरयष्टी असे शिवरायांचे व्यक्तिमत्त्‍व या शिल्पात आहे. घोड्याचे पिळदार स्नायू, त्याचे तगडे पाय, लगाम खेचल्यावर वळलेली मान आणि पाय रेटत थांबलेला घोडा. घोड्याच्या शरीरशास्त्राचा सुंदर अभ्यास त्यात दिसतो. घोड्याचा रेटलेला उजवा पाय आणि शिवरायांचे रिकिबीमधले पाय हे एकाच अँगलमध्ये असून घोडा ज्या गतीमध्ये थांबला आहे, तो विशेष क्षण या शिल्पात टिपलेला दिसतो.

महाराजांचे घोड्यावरील पूर्ण नियंत्रण हे अनेक अर्थानी प्रतिकात्मक ठरेल अशा पद्धतीने शिल्पकारांनी योजले आहे. घोड्याच्या शेपटीचे केस समोरील बाजूस झुकलेले असून यावरून घोड्याची गती आणि थांबण्याची स्थिती लक्षात येते. महाराजांचे कपडे, त्याच्या पडलेल्या घड्या यांचे उत्कृष्ट शिल्पांकन या शिल्पात आहे. बी. आर. खेडकर यांची काम करायची विशिष्ट शैली, कपड्याचे उठावदार फोल्ड, दागिन्यांचे आणि इतर कलाकुसरीचे एकूणच काम पारंपरिक असून ते या शिल्पाला पूर्णत्वास नेते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदावार्ता! ऑगस्ट महिन्याचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरूवात, पण किती येणार?

Kulman Ghising : नेपाळ सरकारने सहा महिन्यांपूर्वी बडतर्फ केलेले कुलमन घीसिंग आता थेट पंतप्रधान बनणार?

Sangola News : सांगोला तालुक्यात ७ मंडल व ३२ तलाठी कार्यालयांसाठी निधीची मागणी, आमदार देशमुखांचा पाठपुरावा

Ambad News : अंबड शहरात वीजेचे शॉर्ट सर्किटमुळे चार दुकाना जळून झाला कोळसा; लाखो रुपयांचे नुकसान

Nanded Crime: महिलेच्या खूनप्रकरणी तिघे ताब्यात; दुधड येथील घटना, हिमायतनगर पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT