State Drama Competition 
मनोरंजन

फ्रेंच 'आर्ट’ च्या मैत्रीचे कंगोरे

सकाळ वृत्तसेवा

काेल्हापूर : यंदाची राज्य नाट्य स्पर्धा सांगतेकडे निघाली असताना एकाहून एक सरस प्रयोगांचा अनुभव रसिकांना मिळतो आहे. गुरुवारी आदित्य हौशी नाट्य संस्थेने ‘आर्ट’ या नाटकाचा दमदार प्रयोग सादर केला.

यास्मिना रेझा यांचे हे मुळ फ्रेंच नाटक. ज्येष्ठ रंगकर्मी व समीक्षक प्रसन्न जी. कुलकर्णी यांनी त्याचे मराठीत नाट्य रूपांतर केले आहे. त्यांनीच या नाटकाचे दिग्दर्शन केले. तीन मित्रांतील मैत्रीचे कंगोरे उलगडताना त्यांनी एका वेगळ्या प्रयोगाचा अनुभव रसिकांना दिला.

तीन मध्यमवर्गीय मित्रांची कहाणी

तीन मध्यमवर्गीय मित्रांच्या कथेवर हे नाटक बेतलं आहे. पंधरा ते वीस वर्षांपासून त्यांची घट्ट मैत्री आहे. यातील मौर्या आणि सर्वेश हे दोन ज्येष्ठ मित्र आपापल्या मतांवर ठाम राहणारे तर सर्वात लहान यासिर स्वतःचं फारसं ठाम मत नसणारा पण तरीही आपल्या दोन ज्येष्ठ मित्रांना सतत सांभाळून घेणारा असल्यामुळे कधीच एकमेकांपासून त्यांच्यातील कुठलीही गोष्ट लपून राहिलेली नाही.

मॉडर्न आर्टच्या अनुषंगाने घडणारी चर्चा

मात्र, एका पेंटींगच्या आणि त्यातही लाखमोलाच्या या कलाकृतीच्या खरेदीवरून या तिघांत घडत जाणारी चर्चा असो किंवा एकूणच मॉडर्न आर्ट आणि त्या अनुषंगाने घडणारे मंथन म्हणजेच हे नाटक.

फ्रेंच नाटककार यास्मिना रेझा  रूपांतरीत ‘आर्ट’

फ्रेंच नाटककार यास्मिना रेझा यांच्या या नाटकाचे जगभरातील विविध ठिकाणी अनेक प्रयोग झाले. विविध भाषांत त्याचे नाट्य रूपांतर झाले. पण, प्रसन्न जी. कुलकर्णी आणि त्यांच्या टीममुळे या नाटकाचा अनुभव येथील रसिकांना राज्य नाट्य स्पर्धेच्या निमित्ताने घेता आला.

प्रश्‍नांवर अंतर्मुख करायला लावणारे नाटक 

एकूणच स्पर्धेचा विचार करता निखळ मनोरंजन करणारे जसे प्रयोग रसिकांना अनुभवायला मिळाले तसेच काही प्रयोग विविध प्रश्‍नांवर अंतर्मुख करायला लावणारेही ठरले. ‘आर्ट’च्या निमित्ताने त्याच्याहीपेक्षा एक वेगळा अनुभव रसिकांना मिळाला. 

पात्र परिचय

 प्रसन्न जी. कुलकर्णी (मौर्या), 
  सुहास कुलकर्णी (सर्वेश), 
  कौस्तुभ बंकापुरे (यासिर).


दिग्दर्शन, संगीत व प्रकाश : प्रसन्न जी. कुलकर्णी
  नेपथ्य : सलोनी कुलकर्णी
  रंगभूषा : सदानंद कुलकर्णी
  प्रकाशयोजना, संयोजन : कपिल मुळे
  संगीत संयोजन : अनुजा कुलकर्णी, प्रकाश निकम
  नेपथ्य साहाय्य : संजय केंबळीकर
  निर्मिती प्रमुख : आकाराम पाटील  

सहाय्यक निर्मिती प्रमुख :आशिष पाटील
  रंगमंच साहाय्य : सदाशिव नेर्ले, सतीश बिडकर, गौतम सावंत, अनुप पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

पंखा लावण्यावरून वाद; महाराष्ट्रातील मोठ्या विद्यापीठात तरुणीचं विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य, पोलिसांवरही दबाव...

Flight Guidelines: विमानाच्या उड्डाणासाठी नवे नियम जाहीर! पायलटचा निर्णय अंतिम असणार; दबाव टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई

Katraj News : भारती विद्यापीठ भागात हॉटेलमध्ये गॅस गळतीमुळे भडका; चारजण जखमी

SCROLL FOR NEXT