Urvashi Dholakia Hospitalized: Esakal
मनोरंजन

Urvashi Dholakia Hospitalized: 'बिग बॉस' विजेती फेम अभिनेत्री रुग्णालयात दाखल! मानेवरील शस्त्रक्रिया यशस्वी

कसौटी जिंदगी की या मालिकेत कोमोलिका म्हणून प्रसिद्ध झालेल्या उर्वशी ढोलकियाच्या मानेवर नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे.

Vaishali Patil

Urvashi Dholakia Hospitalized: मनोरंजन विश्वातून एक बातमी समोर आली आहे. 'कसौटी जिंदगी की' या मालिकेत कोमोलिकाची भुमिका साकारुन घरघरात पोहचलेली आणि रिअॅलिटी शो 'बिग बॉस 6' ची विजेती अभिनेत्री उर्वशी ढोलकियाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वशीच्या मानेमध्ये गाठ झाली होती. तिच्या मानेवर नुकतीच शस्त्रक्रिया झाली असून सध्या तिच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, उर्वशी ढोलकियाच्या मानेमध्ये एक छोटासा ट्यूमर आढळला होता, डॉक्टरांनी यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करुन तो काढला आहे. आता डॉक्टरांनी तिला 15-20 दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

उर्वशी ढोलकियाचा एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात उर्वशी हॉस्पिटलमध्ये बेडवर पडलेली दिसते. हा फोटो तिचा मुलगा क्षितिजने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, उर्वशी ढोलकियाने तिच्या तब्येतीबाबत एक स्टेटमेंटही दिले आहे. यात तिने सांगितले की, तिच्या मानेमध्ये ट्यूमर असल्याचे निदान झाले होते. डिसेंबर 2023 च्या सुरुवातीला तिच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. माझी शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून आता मला 15-20 दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

उर्वशी ढोलकिया ही लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रींपैकी एक आहे. 'कसौटी जिंदगी की' आणि 'नागिन 6' अशा लोकप्रिय मालिकांसाठी ती ओळखली जाते. टीव्हीची 'कोमोलिका' तिच्या जबरदस्त व्यक्तिरेखा आणि लूकसाठी ओळखली जाते. ती नकारात्मक भुमिका साकारण्यासाठी खुप प्रसिद्ध आहे.

आता तिच्या प्रकृतीबाबत समजल्यानंतर तिचे चाहते ती लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. 'देख भाई देख', 'कभी सौतन कभी सहेली', 'कहीं तो होगा' या प्रसिद्ध टीव्ही मालिकेत ती झळकली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : मुख्यमंत्री मद्यप्राशन करून विधानसभेत पोहोचले? अकाली दलने शेअर केला व्हिडीओ, डोपिंग टेस्टची मागणी...

Thane: ठाण्यात पहिल्यांदाच डबल डेकर बस धावणार, कधीपासून प्रवाशांच्या सेवेत येणार?

Crime: जमिनीच्या वादातून तरुणाला संपवलं; नंतर मृतदेहाची जंगलात विल्हेवाट, ठाण्यातील प्रसिद्ध रीलस्टारला अटक, १२ वर्षांनी गूढ उलगडलं

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात पावसाची जोरदार हजेरी...४३ अंशांच्या तडाख्यानंतर जिल्हावासीयांना सुखद दिलासा!

Anewadi Toll Traffic Jam : पुणे-बंगळुरू हायवेवर 5 किमीच्या रांगा! आनेवाडी टोलवर मुंबई–पुण्यातील चाकरमानी अडकले; सलग सुट्ट्यांमुळे महामार्गावर प्रचंड गर्दी

SCROLL FOR NEXT