Konkan Hearted Girl Ankita Walawalkar Will Enter in politics Raj Thackeray Mns video viral vnp98 Esakal
मनोरंजन

Ankita Walawalkar: कोकण हार्टेड गर्ल करणार मनसेत प्रवेश ? अंकिता वालावलकरने स्पष्टच सांगितलं

Vaishali Patil

Konkan Hearted Girl Ankita Walawalkar: सध्या मराठी कलाकारांचा राजकारणाकडे कल वाढला आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनेक मराठी कलाकरांनी राजकीय पक्षात प्रवेश केला आहे.

त्यात कालच अभिनेता अभिजीत केळकर याने देखील भाजपात प्रवेश केला. आता त्यातच आणखी एका कलाकाराने राजकारणात येण्याबद्दल हिंट दिली आहे. ती कलाकार म्हणजे अंकिता वालावलकर

अंकिता वालावलकर ही कोकण हार्टेड गर्ल म्हणून प्रसिद्ध आहे. अंकिताचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत असतात. अंकिता यु ट्यूबवर सुद्धा सक्रिय असते. अंकिताचे व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरत असतात.

तिने केवळ रील स्टार म्हणून लोकप्रियता मिळवलेली नाही तर तिने तिच्या बऱ्याच व्हिडिओतून सामाजासाठी काही तरी करण्याचा प्रयत्न देखील करत असते. तिचे असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

अशातच आता अंकिता देखील राजकारणात येण्याचा विचार करतेय असं तिच्या वक्तव्यावरुन दिसतयं. अंकिता वालावलकरने नुकतीच सकाळला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला तिच्या राजकारणातील एंट्री बद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी तिने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

ती म्हणाली, "पहिल्यापासून राजकारणातलं एक व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे मला फार आवडायचे. त्यानंतर राज ठाकरे हे व्यक्तीमत्व आवडायचं कल असं नाही म्हणता येणार पण आपल्याला कळत ना कोण चांगलं काम करत आणि स्पष्ट बोलतयं मी पहिल्यांदा त्यांच्या घरी गेले त्यामुळे त्यांच्या पक्षाशी जास्त संबंध आला."

"पण असं काही नाही की पक्षाकडे जाण्याचा काही विचार होता पण असं वाटलं की माझ्यामुळे कुणाचं भलं होत असेल आणि चांगली संधी आहे. तर मी तिथे उभी राहते मग मी पक्ष किंवा व्यक्ती पहात नाही तिथे उभी राहते."

थोडक्यात अंकिता वालावलकरने अद्याप ती राजकारणात येणार असल्याचं सांगितलं नाही. मात्र, चांगली संधी मिळाली आणि तिला ते गरजेच वाटलं तर ती नक्कीच राजकारणात येईल.

यावेळी तिने ती राज ठाकरे यांच्या मनसेत जाईल अशी हिंट दिली आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी तिचं कौतुक करत आहे.

यावर्षी मार्च महिन्यात अंकिता वालावलकरने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी अंकिता वालावलकरबरोबर इतरही क्रिएटर्स होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

ENG vs IND: १ बॉल ६ धावा अन् भारताची कर्णधार आऊट; इंग्लंडचा भारतावर शेवटच्या चेंडूवर विजय

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

SCROLL FOR NEXT