Konkana Sen Sharma Reaction On Animal Movie esakal
मनोरंजन

Konkana Sen Sharma: 'हिंसा अन् इंटिमेट सीन दाखवण्यामागे तुमचा उद्देश काय हे तर कळायला नको का?'

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा ही आता तिच्या द किलर सूप नावाची मालिका चर्चेत आली आहे.

युगंधर ताजणे

Konkana Sen Sharma Reaction On Animal Movie : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा ही आता तिच्या द किलर सूप नावाची मालिका चर्चेत आली आहे. त्यामध्ये मनोज वाजपेयीनं महत्वाची भूमिका साकारली आहे. कोंकणाच्या त्या मालिकेनं प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे.

अशातच कोंकणानं द किलर सूपच्या प्रमोशनच्या दरम्यान रणबीर कपूरच्या अॅनिमलवर दिलेली प्रतिक्रिया नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. तिनं संदीप रेड्डी वांगाच्या चित्रपटावर परखडपणे भाष्य केले आहे. ती काय म्हणाली हे आपण जाणून घेणार आहोत.

साऊथचा प्रसिद्ध दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाचा अॅनिमल नावाचा चित्रपट गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा, चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यात रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल, अनिल कपूर यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. त्यानं बॉक्स ऑफिसवर सहाशे कोटींपेक्षा जास्त कमाई करुन वेगळाच विक्रम आपल्या नावावर केल्याचे दिसून आले.

बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी रणबीर आणि त्याच्या अॅनिमल चित्रपटावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर, कंगना रनौत यांच्या प्रतिक्रियांनी वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली होती. महिलांना या चित्रपटातून वेगळ्या प्रकारे चित्रित करण्यात आल्याचे अनेकांचे म्हणणे होते. यावर अभिनेता रणबीरची प्रतिक्रियाही समोर आली होती.

रणबीरनं म्हटलं होतं की, प्रत्येकाची आवड निवड वेगळी आहे. काहींना तो चित्रपट वाईट वाटला अर्थात ते त्यांचे मत आहे. मी मात्र बॉक्स ऑफिसवरील आकडे काय सांगतात हे पाहतो. त्यावरुन मला जे समजायचे ते समजते. अशा आशयाची प्रतिक्रिया रणबीरनं दिली होती. यात आता अभिनेत्री कोंकणाच्या प्रतिक्रियेनं पुन्हा वेगळाच वाद सुरु झाला आहे.

कोंकणा काय म्हणाली?

द किलर सूपच्या प्रमोशनच्या वेळेस आयोजित करण्यात आलेल्या एका मुलाखतीमध्ये कोंकणानं सांगितलं की, मला एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे, मी काही स्क्रिन वर हिंसा दाखविण्याच्या विरोधात नाही. मात्र ती हिंसा दाखवताना त्यामागे काही ठोस कारण असावे. त्या शिवाय ती हिंसा तुमच्या पर्यत वेगळ्या अर्थानं पोहचते. हिंसा आणि इंटिमेट सीन्स हे तुमच्या स्टोरीला पुढे नेण्यासाठी असायला हवेत.

केवळ प्रेक्षकांना चांगले वाटेल म्हणून किंवा डायरेक्टरला ते सीन हवे आहेत का, या कारणास्तव तुम्ही तुमच्या चित्रपटामध्ये त्या सीनला कात्री लावणार नसाल तर मग काय बोलायचे...अशा शब्दांत कोंकणानं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT