kosla movie announcement based on book written by bhalchandra nemade SAKAL
मनोरंजन

Kosla Movie: नेमाडेंच्या 'कोसला'वर येतोय मराठी सिनेमा; दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत होणार घोषणा

नेमाडेंच्या कोसला कादंबरीवर मराठी सिनेमा येणार आहे

Devendra Jadhav

Kosla Marathi Movie: भालचंद्र नेमाडेंच्या कोसला कादंबरीचे अनेक चाहते आहेत. अनेक वर्ष लोटली तरीही मराठी साहित्यविश्वात कोसला कादंबरीची चर्चा होते. अशातच कोसला कादंबरीसंबंधी एक मोठी घोषणा करण्यात आलीय.

नेमाडेंच्या कोसला कादंबरीवर आता मराठी सिनेमा येणार आहे. येत्या काही दिवसात दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत ही घोषणा होणार आहे.

कोसला वर येतोय मराठी सिनेमा

नेमाडेंच्या कोसला वर मराठी सिनेमा येणार आहे. कोसला - उदाहरणार्थ मी असं या सिनेमाचं नाव आहे. निर्माण स्टूडिओज आणि मेहूल शाह यांनी या सिनेमाची निर्मिती केलीय.

आदित्य राठी आणि गायत्री पाटील या दोघांनी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धूरा सांभाळली आहे. सयाजी शिंदे, सोनाली कुलकर्णी, अच्युत पालव या दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत सिनेमाची घोषणा होणार आहे. 'कोसला'कार भालचंद्र नेमाडे स्वतः या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

कुठे आणि कधी होणार घोषणा?

२७ नोव्हेंबरला दुपारी २ वाजता मुंबईत ही घोषणा होणार आहे. यावेळी सिनेमाची संपुर्ण टीम आणि कलाकार उपस्थित राहणार आहेत.

अशाप्रकारे नेमाडेंच्या लोकप्रिय कोसला कादंबरीवर सिनेमा येणार असल्याने पुस्तकप्रेमी आणि सिनेप्रेमी सर्वांची उत्सुकता शिगेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT